सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजमध्ये शपथग्रहण समारंभ संपन्न
मान्यवरांची उपस्थिती


नाशिक : सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथे दीप प्रज्वलन व शपथ ग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभाद्वारे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनी नर्सिंग क्षेत्रातील पवित्र सेवेत पहिले पाऊल ठेवले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायाच्या जनक, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन समाजसेवा व रुग्णसेवेसाठी ज्योत प्रज्वलित करून आपले जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली हा क्षण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला. या कार्यक्रमास केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या सदस्या व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्या, प्राचार्या डॉ.कांचन देसरडा, लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक व नाशिक शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.उमेश मराठे, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष नहार, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या माजी अधिष्ठाता शमा माहुलीकर, साई संजीवनी ट्रस्टचे सचिव डॉ. स्वप्निल खैरनार, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सोनाली ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेचे मार्गदर्शक प्रा. केवळराव खैरनार यांनी प्रास्ताविक करत संस्थेचा प्रवास, उद्दिष्टे आणि हा समारंभ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सेवेचे महत्व ज्ञान आणि करुणा या मूल्यांची आठवण करून देतो तसेच नर्सिंग व्यवसायातील सेवाभाव याबद्दल विचार मांडले.
सूत्रसंचालन डॉ.रत्ना चोपडे व डॉ.पल्लवी पाटील यांनी केले.

समारंभप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.महेश सातपुते व प्रा.ललिता धुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे जीवन आणि प्रवास या विषयावर आधारित नाट्यछटा सादर केली त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार संस्थेचे विश्वस्त श्री.रामकृष्ण ठाकरे यांनी मांनले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.भाग्यश्री सूर्यवंशी, प्रा. महेश आहेर प्रा. सतीश पाटील, सोनाली महाजन, शहेरबानो शिकलगर, पूजा जाधव, पल्लवी शेवाळे, सुनिता वसावे, शितल पठारे, लखन चव्हाण, त्रिशरण सहजराव, तारकेश बागुल, यांनी परिश्रम घेतले.



