करिअरमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापनदिन उत्साहात

डॉ.विजय बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अभोणे येथे आयोजन

कळवण : डांग सेवा मंडळ नाशिक संचालित, डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. मगरे होते. याप्रसंगी डॉ. मगरे यांनी सांगितले की,’ राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची संधी देते. तसेच योजनेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण करणे, राष्ट्रीयत्वाची भावना वाढवणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हे असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी’ कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवींद्र पगार यांनी मानले. आभार प्रा. बी. जी. बोरसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!