शिरपुर येथे भजन स्पर्धा उत्साहात संपन्न
माळी गल्ली येथील श्रीकृष्ण मंदिरात आयोजन

सुभाष जगताप (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)

शिरपूर : शिरपुर श्रीकृष्ण मंदिर माळी गल्ली शिरपूर येथे तालुका महानुभाव पुजारी भोपे समाज तालुकाध्यक्ष राजेंद्र भास्कर कोठिकर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कृष्ट “भजन स्पर्धा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख मान्यवर प.पु.रुषीराज दादा भोजने, प.पु.अभयदादा पंजाबी, त.प. सुशिलाआई गुजर, त.प.छायाबाई लांडगे, त.प.दयाबाई लांडगे, शिरपुर वरवाडे नगर परिषदेचे नगरसेवक संतोषभाऊ माळी, राजेंद्र कोठीकर, ताराचंद माळी या सर्व मान्यवरांनी श्रीकष्ण मुर्तीस फुलहार, विडा अर्पण केले भजनाची स्पर्धा सुरुवात करण्यात आली.



धार्मिक वातावरणात स्पर्धेत जवळ जवळ 40/50 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यात महिला भक्तांचा विशेष सहभाग होता तर भजन स्पर्धेत सहभागी सर्व भक्तांना एक पेन बक्षीस देण्यात आला आणि नंतर खालील 6 स्पर्धकांना, प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस मान्यवराहस्ते मान सन्मान करण्यात आला – प्रथम क्रमांक—
1) शोभाबाई मगन मिस्तरी रा दोंडाईचा
2) शितल धिरज पाटील रा, शिंगावे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला
3) अनिता रवींद्र पाटील रा. शिरपूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला
4) शोभाबाई देविदास पाटील रा विखरण यांनी चौथा क्रमांक मिळविला. 5) दिनेश अधिकार पाटील रा.हिंगोणी यांनी पाचवा क्रमांक मिळविला. 6) वंदना प्रविण मराठे माॅं.दुर्गा महिला भजनी मंडळाचे सदस्य रा.गायत्री काॅलनी शिरपूर यांनी सहावा क्रमांक मिळविला या भजन स्पर्धेत शिरपुर तालुका व शिरपुर शहरातुन भक्तांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षक म्हणून-
1) प.पू.श्री ऋषीराज दादा भोजने रा.गुजर खर्दे ता शिरपूर
2) प.प.श्री अभयराज दादा पंजाबी किर्तन सम्राट रा.हिंगोणी ता शिरपूर हे होते यांच्या सह महिला, पुरुष सदभक्त उपस्थित होते.
सुत्र संचालन- प्रा.समीर विजयराव पवार यांनी केले. नंतर राजेंद्र भास्कर कोठिकर यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून सत्कार केला आणि सर्वांनी अल्पोपहार घेतला. आयोजक राजेंद्र भास्कर कोठिकर यांनी आलेल्या सर्व बांधवांचे आभार मानले.




