आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

नाएसो पतसंस्था सभासदांना मिळणार 6.25 टक्के लाभांश

संस्थेचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची को.ऑप क्रेडिट सोसायटीची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.20 सप्टेंबर 2025 रोजी सागरमल मोदी शाळेत संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेला गेल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षात 34 लाख 59 हजार 297 रुपये नफा झाल्याने सभासदांना 6.25 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा प्रा.दिलीप फडके यांनी करून सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ना.ए.सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, क्रेडीट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव सवारी पवार, उपाध्यक्ष दिनेश देवरे, ना.ए.सो.कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्षा नंदा पेटकर, खजिनदार सायली कुलकर्णी, संचालक शैलेश पाटोळे आदी उपस्थित होते.

वार्षिक अहवाल वाचन करून संस्थेच्या वतीने सभासदांना १२ लाख रुपयांचे दीर्घ कर्ज व आकस्मित कर्ज ५० हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते अशी माहिती सेक्रेटरी साहेबराव सवारी पवार यांनी दिली.प्रारंभी सरस्वती दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.सभेच्या सुरुवातीला दिवंगताना श्रद्धाजंली वाहण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक क्रेडिट सोसायटी उपाध्यक्ष दिनेश देवरे यांनी केले.यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व आदर्श शिक्षकांचा संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके,उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे या मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्रक व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.सूत्रसंचालन प्रशांत केंदळे तरआभार दिनेश देवरे यांनी मानले.सभेस खजिनदार सायली कुलकर्णी, संचालक शैलेश पाटोळे, अतुल करंजे, कल्याणी अग्निहोत्री, अरविंद दिघे, अजित निखाडे, डॉ.लक्ष्मी कस्तुरे, अविनाश सातपुते, प्रभाकर बच्छाव, हेमंत कडाळे, संजीव वाणी, प्रवेश नरसकर, प्रवीण जाधव, नीलिमा कांबळे, यांच्यासह संस्थेच्या विविध शाळातील मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!