धरणगावच्या येवले परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी
आईच्या तेराव्यानिमित्त मंदिराला दिली देणगी, समाजासमोर ठेवला आदर्श...

जळगाव : समाजाचं देणं लागतो, या भावनेतून अनेक जण आपले समाजाप्रती योगदान देत असतात. मूळचे धरणगाव येथील रहिवासी आणि सध्या नाशिकमध्ये स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विठ्ठल येवले यांच्या मातोश्री लीलाबाई यांचे नुकतेच निधन झाले.
आईंच्या स्मरणार्थ मुले प्रकाश येवले, गणेश येवले यांनी धरणगाव येथील बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारसाठी 11 हजार 111 रुपयांची देणगी देत समाजासमोर आदर्श ठेवलाय.
धरणगाव येथील श्री बालाजी मंदिर जिर्णोद्धार निर्माण समितीचे अध्यक्ष प्रा.डी.आर.पाटील तसेच समितीचे पदाधिकारी चंद्रकांत विष्णु अमृतकर यांच्याकडे विठ्ठल बेणिराम येवले व लिलाबाई विठ्ठल येवले यांच्या स्मरणार्थ श्री बालाजी महाराज मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी 11,111/- रुपये देणगीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विठ्ठल येवले, प्रा.शुभांगी प्रकाश येवले, आयुष येवले, अनुष्का येवले, गणेश येवले, सुवर्णा येवले, लताबाई अरुण वाणी (पारोळा), प्रमिलाताई पांडुरंग शिरोरे (निवाणे), शोभाताई प्रकाश मुसळे (डांगसौंदाणे), राजेंद्र वसंत येवले, गायत्री राजेंद्र येवले (मालेगांव) आदी उपस्थित होते. येवले परिवाराने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होते आहे.




