विशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

सागरमल मोदी शाळेत बैलपोळा उत्साहात

(नाशिक) – येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बैलपोळा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या घर, झाड, विहीर, शेती (उगवलेले गव्हाचे तृण), रांगोळी या सर्व गोष्टींचा वापर करून कृषीनगर गावाची प्रतिकृती मांडण्यात आली. गुंबाडे, राजश्री शेळके, पायल जावळे या विद्यार्थ्यांनी बैलपोळा सणाची माहिती आपल्या भाषणातून दिली. शिक्षिका उषा जोपळे यांनी बैलपोळा संदर्भात पौराणिक कथा सांगितली. विभाग प्रमुख मनीषा जोशी व शिक्षक हर्षल कोठावदे यांनी बैलपोळ्याचे महत्त्व सांगितले.

शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे यांनी बैलपोळा साजरा करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी विद्यार्थी शेतकरी वेशभूषेत तर विद्यार्थिनी नऊवारी साडीत शोभून दिसत होते. बैलपोळा निमित्त मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी गीतावर चौथी फ व चौथी ग च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले व तिसरी फ व ग चे विद्यार्थी आणि शिक्षक गणेश गांगोडे यांनी शेतकरी गीत सादर केले. आज मातृदिनानिमित्त आईची महती प्रज्ञा झळके व आपल्या आयुष्यात आईचे महत्व गीताद्वारे वैभव गायकवाड याने सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक शिरुडे, उषा जोपळे, प्राजक्ता क्षीरसागर, हर्षल कोठावदे, क्रांती बोराटे, प्रतिभा बाविस्कर, मंगला बनकर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही मैंद,प्रांजल लाड व स्वरा जंजाळ हिने केले. समृद्धी जठार हिने आभार मानले.

वाचकांच्या माहितीसाठी

नाशिकच्या जवळ असलेल्या गंगापूर येथे जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब सुरू करण्यात आला असून या क्लबमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच ठिकाणी क्लबतर्फे शिवसुमन आनंदाश्रम चालविण्यात येतो. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरुपी राहण्याची सुंदर व्यवस्था निर्माण करण्यात आली असून डाॅक्टर्स, नर्सेस तसेच केअर टेकरचीही व्यवस्था इथे करण्यात आली आहे. या ठिकाणी अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अगदी नाममात्र शुल्क आकारून इथे ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपर्क – विजयकुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष, जय शंकर विजयांगण व शिवसुमन आनंदाश्रम, मुुक्त विद्यापीठ रोड, वंडन झोनजवळ, नाशिक-422 222. संपर्क – 7720030574, 8888947979.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!