रोटरी क्लब ऑफ कळवणच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान
डाॅक्टर्स डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

(प्रा. रवींद्र पगार, कळवण शहर प्रतिनिधी)
कळवण (वार्ताहर) – डाॅक्टर्स डेनिमित्ताने संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर राेटरी क्लब ऑफ कळवणच्या वतीने येथील डॉ. दौलतराव आहेर पतसंस्थेच्या प्रमोद महाजन सभागृहात ‘डॉक्टर डे’ च्या निमित्ताने तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कळवणतर्फे वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण रोटरीचे अध्यक्ष किरण निखाडे होते. कार्यक्रमासाठी विलास शिरोरे, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस बी सोनवणे, अविनाश पगार, राजेश मुसळे, निलेश दुसाने, यश देवघरे, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष कविता बिरारी, स्मिता खैरनार ,मंजुषा देवघरे इत्यादी रोटेरियन उपस्थित होते.
डॉक्टर्स डेनिमित्त यांचा झाला सन्मान
सामाजिक कार्यात नेहमीच आपले योगदान देणाऱया कळवण तालुक्यातील डॉ. जे. डी. पवार, डॉ. जी. व्ही.मालपुरे, डॉ. पी.पी. पगार, डॉ. के.के. कोठावदे, डॉ. डी.एल. मुर्तडक, डॉ. देविदास चित्ते, डॉ. देसले, डॉ. रूपाली गांगुर्डे, डॉ. राजेंद्र मुर्तडक, डॉ. सुलभा मुर्तडक, डॉ. शैलजा पगार.





