कृषीमहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

अंतापूरचे आदर्श शेतकरी नानाजी जाधव वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्काराने सन्मानित

उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

मुंबई (विशेष वार्ताहर) – बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील आदर्श शेतकरी नानाजी जाधव (टोपीवाले) यांना नुकताच यंदाचा वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन 1 जुलैला कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने कृषी क्षेत्रातील योगदान देणाऱया घटकांना कृषी व तत्सम विषयांतील पुरस्कार देवून कार्याची दखल घेतली जाते.

या वर्षी वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कारासाठी अंतापूरचे सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शेतकरी नानाजी जाधव यांची निवड करण्यात आली होती. रोख 35 हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी युवा शेतकरी रोहिदास नानाभाऊ जाधव, यांच्यासह जाधव परिवारातील सदस्य, मित्रपरिवार सहकुटुंब उपस्थित होते. मुंबई येथील मंत्रालयाजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात पुरस्काराचे वितरण झाले. नानाजी जाधव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नम्र आवाहन, आपणही आपले 13 रुपये सत्पात्री दान आपल्या सोयीने वृद्धाश्रमाला देवू शकता… नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास आपणही 13 रुपयांची मदत करू शकतात. आपल्याला स्वेच्छेने सामाजिक कार्यासाठी 13 रुपये दान करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता. आपली 13 रुपयांची मदत देण्यासाठी क्यूआर क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!