उद्योग व व्यवसायकरिअरविशेषशहरशैक्षणिक

मोखाडा आयटीआयच्या ६० प्रशिक्षणार्थींची बॉश कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड

प्राचार्य रोहन चुंबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

मोखाडा : येथील वीर तिलका मांजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) ६० प्रशिक्षणार्थ्यांची नाशिक येथील ख्यातनाम बॉश कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड करण्यात आली आहे.

बॉश कंपनीचे प्रशिक्षण आणि विकास व्यवस्थापक अनंत दांडेकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. फिटर व्यवसायाचे १७, इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे २० आणि मोटार मेकॅनिक व्यवसायाचे २३ प्रशिक्षणार्थ्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयचे प्राचार्य श्री. रोहन चुंबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मोखाड्यासारख्या दूरच्या आदिवासी भागातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रथमच नामांकित कंपनीत शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. ही निवड प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक विजय खंदारे, शिल्पनिदेशक साहेबराव धनवटे, राजेश हरळ, शशिराज बाविस्कर, प्रकाश मार्के यांनी संयोजन व मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होत असून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रयत्नांची दखल घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!