करिअरमहाराष्ट्रशहरशैक्षणिकसामाजिक

इतिहासातून शहाणपण घ्यावे : प्रा.साहेबराव धनवटे

मोखाडा : विभाजन विभीषिकादिन उत्साहात साजरा

मोखाडा – “जो समाज आपला इतिहास विसरतो, तो कालांतराने नष्ट होतो. त्यामुळे फाळणीच्या भयानक वेदनांमधून आपण राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवण्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रा. साहेबराव धनवटे यांनी केले. ते तिलका मांझी आयटीआयमध्ये ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शशिराज बाविस्कर होते. यावेळी प्रकाश मार्के, कार्यालयाचे प्रमुख संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. धनवटे म्हणाले, “१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, परंतु त्याचवेळी देशाचे दोन तुकडे झाले. मुस्लिम बहुल पाकिस्तान वेगळा झाला आणि धर्मनिरपेक्ष भारत राहिला. या विभाजनावेळी सुमारे दहा लाख निरपराध लोकांचा बळी गेला, तर दीड कोटी नागरिकांना स्थलांतर करावे लागले. तब्बल ५५ लाख हिंदू व शीख महिलांचे अपहरण झाले. करोडो रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. लाखो नागरिकांना ‘रिफ्यूजी कॅम्प’मध्ये राहण्याची वेळ आली. ही महाभयंकर त्रासदी विसरता कामा नये.”

ते पुढे म्हणाले, “आज देशाने एकसंध राहण्यासाठी फुटीरतावादी प्रवृत्ती दूर ठेवायला हव्यात. राष्ट्राची एकता आणि अखंडता ही सर्व नागरिकांची पहिली बांधिलकी असावी. धार्मिक आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान आजही प्रगती करू शकला नाही आणि भारताशी अनावश्यक शत्रुत्व ठेवतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून राष्ट्रहित जपले पाहिजे.”

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती भाविका तुंबडे, अझहर शेख, माणिक घोडके, भालचंद्र राऊत, हेमंत भोये, कमलाकर थाळेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेश हरळ यांनी केले, तर आभार दीपा राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!