धार्मिकमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिकसांस्कृतिक

वारकरी संप्रदायाने केलेला सत्कार हा सर्वोच्च सन्मान : शंकरराव खलाणे

नेर (प्रतिनिधी) : श्रीसंत सावता भजनी मंडळ व श्रीसंत सावता ट्रस्ट यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा श्री संत सावता महाराज मंदिरात संपन्न झाला. यात राज्य कृषी मुल्य आयोग अंतर्गत कांदा धोरण व उपाययोजना या महत्वपुर्ण समीतीवर निवड झाल्याबद्दल शंकरराव खलाणे यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय देशमुख यांची निवड़ झाली त्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच शिवसेना शिंदे गटाच्या धुळे तालुका समन्वयक पदी देविदास माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.पोलिस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रतीलाल वाघ तसेच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात पुरवठा विभागात अधिकारी म्हणून निवृत्त मेजर भिला माळी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

माळी राजा गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी नामदेव बोरसे यांची निवड झाली, त्याबद्दल सत्कार करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.तुकाराम हाबा माळी हे होते. तर यावेळी राजाराम हिराजी माळी, तुळशीराम बोढरे,वना माळी, यांच्या सह वारकरी संप्रदायातील महिला बघीनी व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरज खलाणे यांनी केले व आभार प्रदर्शन भाऊसाहेब बोढरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!