संतश्री गजानन महाराज समाधी दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
श्रीगजानन महाराज सेवा संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन


नाशिक – येथील श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने नाशिक शहरातील अध्यापन क्षेत्रात योगदान देणा-या घटकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप गरुड हे हाेते.
शिक्षण म्हणजे समाजाच्या आरसा असून तो दाखवण्याचे काम शिक्षक करतो देशाचा विकास व सुदृढ, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. या कार्याला भरभरून प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करते. या सेवाभावी संस्थेमार्फत गेल्या काही वर्षापासून समाजासाठी विविध धार्मिक व सामाजिक कामातून कृतज्ञता व्यक्त केली जाते, असे प्रतिपादन डॉ. दिलीप गरुड हृदयरोग तज्ञ यांनी केले. रविवार पेठे येथील श्री अवधूत स्वामी मठ येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी श्रींच्या रजत मुखवट्यास स.८ वा. रुद्राभिषेक-पूजन आरती सहपत्निक श्री.अजय गोसावी – मंगेश लहागे, गंगावाडी भक्त मित्र मंडळ यांचे हस्ते होउन हभप दामोदर महाराज गावले यांचे किर्तनानंतर संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ मानकरी
सहाय्यक प्राध्यापक – केटीएचएम कॉलेजच्या सौ. कीर्ती बामणोदकर, व्हीएन नाईक कॉलेजच्या डॉ. रूपाली सानप.
मुख्याध्यापक – सुनंदा ठाकरे मराठा हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय नंदिनी कहांडळ, पेठे विद्यालय गंगाधर बदादे, कोठारी कन्या सुनिता कासार, बालमुक्तांगण अनुराधा जोशी, पुरुषोत्तम हायस्कूल सुगंधा सोनवणे, गोपाळ विद्यालय पिंपळे ता.सिन्नर लक्ष्मण बेनके, सरस्वती विद्यालय देवयानी भदाणे.
माध्यमिक शिक्षक – श्री.नितीन धायगुडे माध्य. विद्यालय उंटवाडी, नर्गिसदत्त विद्यालय मनीषा साळुंके, डीडी बिटको बॉईज लतिका गरुड, वायडी बिटको गर्ल्स हाय. कैलास बागुल, सारडा कन्या विद्यालय शामल पाटील, सॅक्रेड हार्ट स्कूल अर्चना सोनवणे, पेठे विद्यालय प्रवेश नरसकर, र.ज.बिटको हाय. मृणाली कुलकर्णी.

प्राथमिक शिक्षक – सागरमल मोदी विदयालयाच्या श्रीम.सुरेखा घुले, श्रीम. क्रांती बोराटे, श्रीम.मंगला बनकर, अनघा कुलकर्णी, जिल्हा परिषद हरसुल शाळा कृष्णा राऊत, जि.प.बलाईदूरी,ता.इगतपुरी सुनंदा अहिरे, जि.प. पिठुंदी,ता.पेठ देविदास भांगरे, प्राथमिक विद्यालय उंटवाडी नेहा बोडखे, मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ शुभांगी कापडणीस. कोठारी मुलींची शाळा श्रीम.सुनिता सोनगिरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रींदर्शन, महाप्रसाद व या कार्यक्रमाचा लाभ सर्व महिला भक्त, जेष्ठ नागरिक, आबाल यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकारणी-आजीव-महीला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.




