प्रौढ मित्रमंडळाचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम व डॉ . शरद पाटील यांची उपस्थिती


नाशिक : येथील कॉलेज रोड परिसरातील प्रौढ मित्रमंडळातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री . राजेंद्र निकम यांच्या हस्ते खालील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ शरद पाटील हे उपस्थित होते.

लक्ष्मण सानप, हर्षल कोठावदे, यशश्री कुलकर्णी, मेघना देशपांडे, प्रतिभा सातपुते, सुनीला पडलीकर, भाग्यश्री धनवटे, उत्तम वाळके आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र निकम म्हणाले की, शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्र घडविण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्याचे महत्वपूर्ण काम प्रौढ मित्रमंडळ करीत आहे.

प्रौढ मित्र मंडळ राबवत असलेले सामाजिक उपक्रम अभिनंदनीय आहेत, असे प्रतिपादन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री राजेंद्र निकम यांनी केले. त्यांचे स्वागत व सत्कार प्रौढ मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी केले व शुभेछा दिल्या. सुरुवातीस प्रार्थना प्रा.आसावरी भट यांनी म्हटली आणि मृदुला पिंगळे यांनी स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुणे राजेंद्र निकम, सचिव नाशिक एज्युकेशन सोसायटी यांचा परिचय अशा चौधरी यांनी करून दिला तर पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा परिचय डॉ.अरविंद चौधरी, मीनल पाटील, रंजना शिरोडे, सुरेश कादी, डॉ.प्रा.लक्ष्मीकांत भट यांनी करून दिला.
पुरस्कार्थींच्या वतीने हर्षल कोठावदे, गणेश नाठे, यशश्री कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन चंद्रकला जोशी यांनी केले तर आभार अनुराधा अमृतकर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य सातपुते, संचालक डॉ.शेवाळे, मार्तंड पिंगळे, नंदकुमार कुवर, अरविंद कोरान्ने, शोभना आहेर,अजित कुलकर्णी, रमेश माखलकर, डॉ.बी. टी.वाणी, सी.जे गुजराथी, कलवणकर, प्रा साळुंके आणि विविध संस्थांचे शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.





