शुयमा ब्राह्मण संस्थेतर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
दीपस्तंभ पुरस्कार व कैवल्य पुरस्कार हा कर्तृत्वाचा सन्मान - डॉ शिरीष देशपांडे


(अजित कुलकर्णी, विकासाची वाट प्रतिनिधी)
पंचवटी – येथील शुयमा ब्राह्मण संस्थेचा दीपस्तंभ व कैवल्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी डॉ. शिरीष देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष सतिश शुक्ल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिवंगत कै.राधाबाई अंधृटकर, कै.सौ.लता इंगे, कै.हरिश्चंद्र (आबा) देशमुख यांचे प्रतिमापुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत कार्यवाह धनंजय पुजारी यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष ॲड. भानुदास शौचे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शिरीष देशपांडे यांचे हस्ते सत्कारमूर्तींना शाल ,सन्मानपत्र, पगडी देवून गौरविण्यात आले. दीपस्तंभ पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन राजश्री भानुदास शौचे यांनी केले.तर कैवल्य पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन उपाध्यक्ष अनिल देशपांडे यांनी केले. सुत्रसंचलन सहकार्याध्यक्ष पं. भुषण शुक्ल यांनी केले. सत्कारप्रसंगी विजय साने, उल्हास सातभाई, लक्ष्मण सावजी, ॲड. अविनाश भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार संस्था कार्याध्यक्ष तुषार जोशी यांनी केले. यावेळी लता ओढेकर, ॲड. लक्षवेध ओढेकर, शुयमा ब्राह्मण संस्था, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष ॲड. श्रीकांत गायधनी मालेगाव ब्राह्मण संस्था अध्यक्ष नंदकुमार पाठक यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

दीपस्तंभ पुरस्कार विजेते १) डॉ.शिरीष दत्तात्रय देशपांडे मंजुषा शिरीष देशपांडे
वे.मू. दिनेश रामचंद्र गायधनी, डॉ. गोविंद मुरलीधर कुलकर्णी, लक्ष्मणराव वासुदेवराव सावजी, विजय राजाराम साने, उल्हास रामकृष्ण सातभाई, ऍड अविनाश जनार्दन भिडे, डाॅ.दिलीप चिंतामण जोशी, सत्यनारायण मोतीलाल त्रिपाठी, विवेक वामनराव कुलकर्णी, श्रीकांत दामोदर गायधनी, शरदराव त्र्यंबक धारणे, विलास गणेश देवळे, श्यामसुंदर गिरीधरलाल जोशी, डॉ. हेमंत मेघश्याम भंडारी, संजय भास्कर जोशी, कमलाकर पांडुरंग कुलकर्णी, सुहास हरिश्चंद्र टिपरे.
कैवल्य पुरस्कारार्थी असे – पं वैभव नारायण दीक्षित, पं. उपेंद्र अरविंद देव, मंजुषा राजेंद्र अगस्ते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी अध्यक्ष अध्यक्ष सतीश शुक्ल, ऍड. भानुदास शौचे, वैभव दीक्षित, अनिल देशपांडे , रवि देव मालती कुरुंभट्टी, तुषार जोशी, भूषण शुक्ल ,अभय अगस्ते, धनंजय पुजारी, मंजुषा अगस्ते, ऍड.प्रणिता कुलकर्णी, महेंद्र गायधनी चंद्रकांत महाजन, सुहास भणगे, चंद्रशेखर गायधनी, उदय जोशी, प्रतिक शुक्ल ,चंद्रशेखर पंचाक्षरी, दिलीप शुक्ल, अर्चना रोजेकर, सुभाष भणगे, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, रोहिणी कुलकर्णी, उपेंद्र देव, रत्नप्रभा गर्गे, रामकृष्ण उपासनी ,अवधूत कुलकर्णी, रोहिणी जोशी, रघुनाथ जोशी, प्रमोद मुळे, भूषण जुन्नरे, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, विश्वास पुराणिक, दिपक कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी, निखिल देशपांडे, चंद्रकांत महाजन, गजानन जाधव आदी उपस्थित होते.




