करिअरमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

कळवण रोटरी क्लबतर्फे पदग्रहण संपन्न

पदग्रहण समारंभानिमित्ताने शिवचरित्रकार प्रा. यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन


प्रा. रवींद्र पगार (विकासाची वाट प्रतिनिधी)

कळवण – रोटरीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे निश्चितच वंचितांना आधार मिळाला आहे. रोटरीसारख्या सामाजिक संस्थेमुळेच जग पोलिओ मुक्त होण्यासाठी मोठा हातभार लागला आहे. रोटरीने आपलं खाली कार्य करताना समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करावी, असे आवाहन शिवचरित्रकार प्रा. यशवंत गोसावी यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ कळवणच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. गोसावी बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, नगराध्यक्ष कौतिक पगार, तहसीलदार कैलास चावडे, सहप्रांतपाल प्रियंका बागड उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी यांनी नूतन अध्यक्ष किरण निखाडे व सेक्रेटरी गणेश पाखले यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी कार्यक्रमासाठी कळवण देवळा सटाणा व मालेगाव येथील सर्व रोटेरियनस उपस्थित होते.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये आदर्श रोटेरियन पुरस्कार मिळवणारे डॉ. जगताप, इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रोजेक्ट चेअरमन पदी निवड झालेले विलास शिरोरे सह प्रांतपाल पदी निवड झालेले अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले. निर्मला संचेती, स्मिता खैरनार, रमेश शिंदे, नितीन संचेती, मनोज भदाणे, अंजूम मिर्झा यांनी रोटरी मध्ये प्रवेश केल्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवींद्र बोरसे यांनी केले तर आभार गणेश पाखले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रवींद्र पगार, बापू कुमावत, निंबा पगार ,अविनाश पगार, डॉ. रवींद्र भामरे, राजू मुसळे, निलेश भामरे, संभाजी पवार, निलेश दुसाने यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!