अमळनेरला पर्यावरण संवर्धन संगोपन श्रमसंस्कार छावणीचे आयोजन
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम


अमळनेर (प्रतिनिधी) – साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसांचे पर्यावरण संवर्धन संगोपन आपली भूमिका जबाबदारी श्रम संस्कार छावणी घेण्यात आली. प्रा.श्याम पवार व प्राचार्य अरविंद सराफ, कवी शरद दादा धनगर , प्रा.सुरेश तात्या, स्वादिष्ट उद्योग समूहचे निलेश पाटील यांनी वृक्षारोपण करून उद्घाटन केले. खरा धर्म तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरवात झाली. संविधानातील उद्देशिका मुलांनी वाचली, या संस्कार छावणीत नंदुरबार नवापूर धडगाव अमरावती अहील्यानगर. संभाजीनगर , धुळे कुसुंबा भुसावळ , जळगाव , अमळनेर असे मिळून 65 विद्यार्थी सहभागी होते. आपण जेव्हा अधिकार मागतो..
त्याला जोडून कर्तव्य येतात… आपण जेव्हा स्वातंत्र्य पाहिजे म्हणतो स्वातंत्र्य ला चिटकून जबाबदारी येते…असे खेळ गाणी गोष्टी गप्पा द्वारे मुलांसोबत संवाद साधला.

भारत महासत्ता होण्याचे स्वप्न साने गुरुजी यांनी पाहीले बलासागर भारत होवो या गीताद्वारे. बलासागर म्हणजे महासत्ता कृती मात्र लक्षात ठेवायची आहे , हातात हात घेत हदयास हदय जोडून , आणि ऐक्याचा मंत्र जपून महासत्ता व्हायचे , बलासागर भारत करायचा आहे पण या देशातील विविधता एकात्मता बंधुता जोपासत…आणि हिंसेने नाही तर प्रेमाने असे दर्शना पवार यांनी मुलांसोबत संवाद साधताना सांगितले. मुलांनी छान पैकी डोंगरावर चढून निसर्ग सौंदर्य चा आनंद घेतला.
गोपाळ नेवे, सराफ सर यांनी शिंदखेडा येथून आलेले योगेश चौधरी या वृक्षमित्रचा सत्कार केला.

साने गुरुजी व त्यांचे समकालीन यांचे कार्य परीचय , मुलामुलींच्या कुटुंब आपला देश, समाजाप्रती जबाबदारी, पारंपरिक खेळ गाणी गोष्टी नृत्यमधून समजून घेतली. वेगवेगळ्या झाडांची पक्षांची ओळख जैवविविधता समजून घेतली. छावणी यशस्वी होण्यासाठी संयोजन समिती मध्ये समृद्धी देसले , आश्वीनी वाघमोडे , शुभम पवार , तुषार पाटील , लोकेश वाणी. , रेणूका लोहार , विशाखा राजपूत , शिव निकम , प्रणव पाटील , प्रथमेश चौधरी , संस्कार छावणी समन्वयक गौरव महाले सर यांनी मेहनत घेतली. या छावणीत अमलनेर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर , डॉ सचिन पाटील , कुसुंबा येथील रणजित शिंदे, डॉ. लिना, अतुल चौधरी, साक्षी रोहित सोनार, अमरावती येथील साने गुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करणारे युवा साथी आकाश देशमुख , शाहू कल्याणकर सह 20 मान्यवर उपस्थित होते.

साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रथा, परंपरा, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा… त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979



