

संतोष ईशी (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी) यांजकडून
नेर : राज्य कृषी मूल्य आयोग अंतर्गत राज्यातील कांद्या पिकाचे विषयक धोरण ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून भावाची चढ उतार नेहमीच होत असते. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कांद्यावर अवलंबून आहे. त्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत एक समिती गाठीत करण्यात आली असून कृषी अभ्यासक व शेतकरी नेते पाशा पटेल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. यात सर्व पणन व कृषी,सहकार कृषी विद्यापीठ या क्षेत्रातील सचिव व संचालक सह १९ विभागातील तज्ञांचा याच्यात समावेश आहे.


धुळे तालुक्यातील नेर येथील कांदाविषयक तज्ञ व कांदा निर्यातदार तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यांच्या कामाची दखल घेत सदर निवड करण्यात आली आहे .केंद्र सरकार व राज्य सरकार यांना कांदा पिकांचा भाव व लागवड विषयी आढावा देणे नाफेड व एन सी. सी. एफ. यांच्या मार्फत कांदा खरेदी तसेच निर्यात धोरण व शासनाच्या कांदा अनुदान याबाबत धोरण धरविण्यासाठी समिती गाठीत करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे शंकरराव खलाणे यांचे पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय संरक्षणराज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार रामदादा भदाणे, आमदार अनुप भैय्या अग्रवाल, आमदार काशिनाथ पावरा , आमदार मंजुळाताई गावित, भाजपा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणे, माजी जि. प. अध्यक्ष सुभाष देवरे, माजी जि. प. सदस्य तुषार रंधे, माजी कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव, माजी जि. प.अध्यक्षा धरतीताई देवरे भाजपा नेते मनोहर भदाणे, सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, मा.जि.प. अध्यक्ष सुधीर जाधव, मा. जि.प. सदस्य आशुतोष पाटील, मा. कृषी सभापती हर्षवर्धन दहिते ,माजी कृषी सभापती संग्राम पाटील,संतोष ईशी,किशोर हालोर, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले , राज्य परिषद सदस्य किशोर संघवी, मुंबई मार्केट संचालक रावसाहेब गिरासे, माजी जि. प. सदस्य पंकज कदम, माजी जि.प सदस्य विरेंद्रसिंग गिरासे ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रदीप पाटील,देवेंद्र पाटील ,अशोक सुडके,यांनी अभिनंदन केले आहे.




