नंदुरबारचे नाव फिल्म फेस्टीव्हलमध्ये झळकले
राहुल पवार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट "खाडमोड"साठी अवॉर्ड


नंदुरबार : पुणे येथे यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातून दोन लघूपटांची निवड करण्यात आली होती. या दोन्ही लझुपटाद्वारे या महोत्सवात प्रथमच आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देणाऱ्या लघुपटाला स्थान मिळाले मिळाले होते. यासाठी ज्या युवकाने पुढाकार घेतला ते राहुल पवार… चित्रपट महोत्सवासाठी नंदुरबार येथील राहुल पवार दिग्दर्शित ‘भांगसर थाळ’ व ‘नंदीबैल’ हे दोन लघुपट (माहितीपट) सादर केले होते.
याच धडपणाऱ्या खानदेशी युवकाने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार नेले. चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर अवॉर्ड देऊन नंदुरबार येथील राहुल पवार यांना गौरवण्यात आले. खाडमोड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राहुल पवार यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले. नंदुरबारचे नाव फिल्म फेस्टीव्हलमध्ये झळकणाऱ्या राहुल पवार यांचे विकासाची वाट न्यूज परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन…





