

अजित कुलकर्णी (विकासाची वाट प्रतिनिधी)
नाशिक : ना.ए.सोसायटीच्या मा. रा.सारडा कन्या विद्या मंदिर येथे महर्षी व्यास यांच्या जन्मादिना निमित्त गुरुपौर्णिमा सकाळ सत्रात इ.५वी अ च्या वर्गाने वर्गशिक्षिका शीतल चौधरी तर दुपार सत्रात इ.9वी अ च्या वर्गाने योगिता भुसारे यांचे मार्गदर्शना खाली उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी निकम आणि माजी मुख्याध्यापिका प्रियंका निकम या होत्या.अध्यक्षस्थानी
उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे आणि दुपार सत्रात मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ या होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे, पर्यवेक्षिका मृण्मयी खरावंडीकर, शिक्षिका शिल्पा पिंगटे आदी उपस्थित होते.कु.कृपा निकम, तनुष्का चव्हाण, स्वरा आहेर या विद्यार्थिनींनी गुरुचे महत्व सांगितले.प्रमुख पाहुण्या प्रियंका निकम यांनी गुरु हा अनुभवाने समृद्ध असतो.गुरुप्रती आदर भाव व नम्रता व्यक्त करण्याची संधी म्हणजेच गुरुपौर्णिमा होय.गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञानाचे कण वेचले पाहिजे यासाठी नेहमी आपल्या मनात गुरूंबद्दल आदर ठेवा तर नक्कीच उत्तम यश प्राप्त कराल असा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनीही गुरु हा आपल्या आयुष्यात कायम मार्गदर्शक म्हणून सोबतच असतो म्हणून नेहमी गुरूंच्या आज्ञेचे पालन करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली.ओंकार वैरागकर व गीतमंच विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली. कु. श्रावणी नरोडे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी विद्यार्थिनींनी एकलव्य व द्रोणाचार्य नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आलिया खान, लावण्या पाटील व सौम्या वाघ यांनी तर आभार कु.प्रिया बनकर हिने मानले.
(बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा…) आपली जाहिरात अतिशय कमी दरात… जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संधी… फक्त 500 रुपयांत तीन दिवस जाहिरात… कमीत कमी दरात… Pamplet छापायची गरज नाही… थेट नागरिकांपर्यंत पोहचण्याचा सुंदर मार्ग म्हणजे विकासाची वाट न्यूज पोर्टलमध्ये कमी दरात दिलेली जाहिरात… नक्कीच एकदा अनुभव घ्या…)
संपर्क साधा : 📞8888947979, 772003057



