विशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

डॉ. विजय बिडकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

अभोणा - डॉ. एस. आर. थोरवतांचे 'गुरुपौर्णिमेचे महत्व' या विषयावर मार्गदर्शन.

प्रा. रवींद्र पगार (कळवण शहर प्रतिनिधी))

कळवण – डांग सेवा मंडळ संचालित डॉ. विजय बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे ता. कळवण जि. नाशिक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मगरे होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. आर. थोरवत यांनी ‘गुरुपौर्णिमेचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,’आधुनिक काळात गुरूंबद्दल आदरातीथ्य लोप पावत चालले आहे. अशा प्रसंगी गुरु पौर्णिमा सर्वत्र साजरी करून गुरूंबद्दल आदर करून व्यक्त करणे गरजेचे आहे. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी गुरूंची भूमिका महत्त्वाची असते.प्राचीन काळात गुरूंबद्दल अतिशय आस्था होती.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के. मगरे यांनी सांगितले की,’ विकसित राष्ट्र निर्मिती मध्ये गुरूंचे योगदान व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. गुरु सर्वच क्षेत्रात असतात. गुरुला तिसरा डोळा संबोधले जाते. सर्वांनी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शक ठरलेल्या गुरुंबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ .रवींद्र पगार यांनी केले. आभार प्रा. डॉ. डी. जे. नेरपगार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा… ✍🏻
पाक्षिक “विकासाची वाट”चा “विजयांगण” दिवाळी विशेषांक : २०२५
📎साहित्य पाठवण्यासाठी अंतिम तारीख : ३१ जुलै २०२५

सविस्तर वाचा 👇🏻
https://vikasachivat.com/?p=2351

(दिवाळी अंकात जाहिरातींसाठी संपर्क साधा)

विजयकुमार इंगळे, संपादक
📞 8888947979
पाक्षिक विकासाची वाट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!