आर्थिककरिअरकृषीविकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात बहरली आमराई… निसर्गरम्य परिसराची पर्यटकांना भुरळ

युवकांचा पुढाकार, लोकवर्गणीतून उभा राहिला उपक्रम...

भिलाजी जिरे (साक्री तालुका प्रतिनिधी)

साक्री – तालुक्यातील मोहगाव हे जेमतेम आठशे ते नऊशे लोकवस्तीचे गाव. साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील शेवटचे व गुजरात सीमेवर वसलेले दऱ्याखोऱ्यांत असलेले गाव. हे १०० टक्के शेती व शेतकरी कोकणी, भिल्ल लोकवस्ती असलेले गाव असून, येथील आठ ते दहा तरुणांनी एकत्र येऊन सहा वर्षांपासून दर वर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच, दहा, पंधरा किंवा वीस आंबा वृक्षाची रोपे देतात. त्यामुळे येथील शेतकरी ते वृक्ष आपल्या शेतातील बांधावर लावतात किंवा नापीक जमिनीवर लावतात. काही शेतकरी कुटुंबांनी या वर्षी आंबेदेखील विकले. परिसरात आमराई चांगलीच बहरली आहे.

मोहगावात ११० कुटुंबे दर वर्षी आंबा लागवडीसाठी पैसे गोळा करतात व गुजरातमधील वासदा येथे जाऊन केशर, लंगडा, राजापुरी, तोतापुरी, हापूस या आंब्याचे कलम रोप तेथून विकत घेऊन गाडीत भरून आणतात व गावात पहिला पाऊस पडल्यावर ज्या कुटुंबाने आंबा रोपांसाठी वर्गणी दिली आहे, त्यांना ती रोपे वाटप केली जातात. जेवढी नोंदणी तेवढीच रोपे दिली जातात.

यासाठी येथील तरुणांनी एकत्र येऊन ही संकल्पना २०१८ मध्ये अमलात आणली. त्यात विशाल गांगुर्डे, उमेश देशमुख, सुरेश चौरे, वामन चौरे, राजाराम गायकवाड, सोन्या चौरे, शांतीलाल अहिरे, अरुण चौरे हे तरुण दर वर्षी या गावात आंबावृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करतात व गावातील कुटुंबाचादेखील सहभाग असतो..

वाचकांना आवाहन…

(बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा… आपली जाहिरात अतिशय कमी दरात… जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संधी… फक्त 500 रुपयांत तीन दिवस जाहिरात… कमीत कमी दरात… Pamplet छापायची गरज नाही… थेट नागरिकांपर्यंत पोहचण्याचा सुंदर मार्ग म्हणजे विकासाची वाट न्यूज पोर्टलमध्ये कमी दरात दिलेली जाहिरात… नक्कीच एकदा अनुभव घ्या…)
संपर्क साधा : 📞8888947979, 772003057

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!