

नितीन इंगळे (विकासाची वाट जिल्हा प्रतिनिधी)
धुळे (वार्ताहर) : तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती प्राथमिक, मुक्ताई पोस्ट बेसीक माध्यमिक संल्लग्न कै. सुकदेव नाना पगारे उच्च माध्य. आश्रमशाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम अभियान, जनजातीय गौरव वर्ष कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात धरती आबा जन भागीदारी अभियान जागरूकता आणि लाभ शिबिर आदिवासी कल्याण स्वप्नपासून लक्षपर्यंत कुसुंबा आश्रमशाळा संकुलात साजरा करण्यात आला.

संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता संभाजीराव पगारे तसेच, उपाध्यक्ष छायाताई पगारे संस्थेचे सचिव स्वप्नील पगारे यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने साजरा करण्यात आला. यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथील पाटकरी, चौधरीं, पी. आर. पाटील तसेच प्राथप्राथमिक विभाग मुख्याध्यापक शेवाळे ए. एल., माध्य. व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्राचार्य गवळी के. एस, बी. एस. पाटील, ग्रामविकास अधिकारी, के. व्ही. तवर ग्रामविस्तार अधिकारी नगाव., डॉ .वैशाली परदेशी, डॉ .रुचिता पाटील, वैद्यकीय अधिकारी कुसुंबा., एस. बी. बागुल, एल. एस. ओ. लॅब सायंटिफिक ऑफिसर., पी. एम. साळुंखे : आशा गट प्रवर्तक, अहिरे ममता, विशाल तलाठी, तेजस शिंदे रोजगार सेवक ग्रामपंचायत, विलास शिंदे : ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार विनोद शिंदे, परिसरातील विविध योजनांचे लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
कार्यक्रमात आदिवासी विविध उपाययोजना तसेच, या परिसरातील लाभार्थ्यांना योजनांचे मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. महीरे पी. बी. यांनी केले. स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत अहिरे बी. आर. व सहकारी शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



