धुळे जिल्हा खरीप मका स्पर्धेत कुसुंब्याचे गणेश चौधरी प्रथम
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते बक्षीस वितरण

नितीन इंगळे (धुळे जिल्हा प्रतिनिधी)
धुळे : धुळे जिल्हा खरीप मका पिक स्पर्धेत तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श शेतकरी गणेश चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय कृषी विभागातर्फे आयोजित खरीप पिक स्पर्धा 2024 /25 या वर्षात हेक्टरी 109 क्विंटल 83 kg ऐवढे ऊच्चांकी मका पिकाचे ऊत्पादन गणेश चौधरी यांनी घेतले. त्यांनी घेतलेल्या उत्पन्नाची दखल घेत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गणेश चौधरी यांना बक्षीस देण्यात आले.

कृषी दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या स्पर्धेत गणेश चौधरी यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी नरवने, कृषी अधिक्षक सूरज जगताप, आत्मा प्रकल्प संचालक सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र समन्वयक नांद्रे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

अल्पखर्ची, विनामशागत प्रकारातील ही मका लागवड होती. मका पाहणीसाठी तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सरवन, कृषी अधिक्षक शिरसाठ, तालुका कृषी अधीकारी वाल्मिक प्रकाश, शिवदे, गायकवाड, बोरसे यांनी भेट देऊन चौधरी यांच्या प्रयोगाची दखल घेतली. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




