शहरशैक्षणिकसामाजिक

मा.रा.सारडा कन्या विद्यामंदिरात शाहू महाराजांना अभिवादन

नाशिक एज्युकेशन सोसायटी

नाशिक (वार्ताहर) : येथील मा.रा.सारडा कन्या विद्यामंदिरात राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून कविता पवार तर अध्यक्ष म्हणून उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे होते.यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्य विषयी कु.तनन्वी इंगळे, आरोही घोटकर, श्रावणी मोरे यांनी उत्कृष्ट भाषणे दिली.


कविता पवार, उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी अनेक पैलू सांगून मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, ज्येष्ठ शिक्षक अतुल करंजे, सुरेखा मोंढे आदी उपस्थित होते.
शाहू महाराजांचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली ओंकार वैरागकर व गीतमंचाने शाहू महाराज जीवनावरती गीत सादर केले.सूत्रसंचालन कु.श्रावणी झांबरे तर तन्वी इंगळे हिने आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थिनी,शिक्षक उपस्थित होते.

सारडा कन्या शाळेत कालिदास दिन साजरा

नाशिक (वार्ताहर) : येथील ना.ए.सोसायटी संचलित मा.रा.सारडा कन्या विद्या शाळेत आषाढस्य प्रथम दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणून संस्कृतच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता अंभोरे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ या होत्या.कु.श्रावणी नरोडे, दीपश्री पवार यांनी कालिदासांची माहिती सांगितली तर भक्ती जगताप हिने कथा सादर केली.

संस्कृत मधील विविध साहित्याची माहिती कु.गायत्री पाटील, अनुजा खैरनार यांनी सांगितली.प्रमुख अतिथी संगीता अंभोरे यांनी कालिदास दिनाचे महत्त्व सांगून मेघदूत या काव्याची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण, जेष्ठ शिक्षिका मनीषा सावळे, कल्याणी कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सौम्य वाघ व लावण्या पाटील यांनी केले.

आमची किटी पार्टी…
✍🏻सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून किटी पार्टीच्या निमित्ताने सामाजिक चळवळ भक्कम करणाऱ्या आपल्या मंडळांची यशोगाथा नक्कीच पाठवा… सोबत मंडळातील महिलांचे, उपक्रमांची छायाचित्रे आवर्जून पाठवावीत. नक्कीच आपल्या किटी पार्टीच्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
📞7720030574 या व्हाट्सअप क्रमांकावर सविस्तर माहिती पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!