

प्रा. रवींद्र पगार (कळवण शहर प्रतिनिधी)
कळवण – तालुक्यातील अभोणा येथील डॉ. विजय बिडकर महाविद्यालय अर्थशास्त्र _ इतिहास व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक लोकसंख्या दिन नुकताच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून डॉ. थोरवत यांनी लोकसंख्या दिन साजरा करण्या पाठीमागची पार्श्वभूमी इतिहास आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून लोकसंख्यावाढीच्या समस्या यावर प्रकाश टाकला. यावेळी
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून भूगोल विभाग प्रमुख किशोर पवार यांनी ‘जागतिक लोकसंख्या आणि सद्यस्थितीतील समस्या’ याविषयी माहिती सांगताना कृषी शोध पूर्व कालखंडातील लोकसंख्या ते 2025 पर्यंत वाढलेली लोकसंख्या आणि त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर झालेला परिणाम याविषयी माहिती आपल्या मार्गदर्शनात सांगितली. भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रम, क्षेत्रफळ , लोकसंख्येचा आकार याचा परिणाम देशाच्या विकासावर कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के मगरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसंख्या वाढ ही गुणात्मक आणि कार्यक्षम वाढले पाहिजे. आणि लोकसंख्या वाढीचा फायदा दरडोई आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नात कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका लता बागुल यांनी केले.
साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रथा, परंपरा, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा… त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979



