

साक्री (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रशाळा डांगशिरवाडे (ता.साक्री) येथील विद्यार्थिनी रिना विनायक सोनवणे हिने परीक्षेत 84.66% गुण मिळवले. तिने जिल्हा गुणवत्ता यादीत चाैथा क्रमांक तर तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. शैक्षणिक सुविधांचा अभाव,पालकांची अनास्था व प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून तिने हे उज्वल यश मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
मुख्याध्यापक श्रीकांत अहिरे, वर्गशिक्षक गाेविंदा बागुल व राजू ठाकरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. शाळेचे व विद्यार्थिनीचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रथा, परंपरा, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा… त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979



