
(नितीन इंगळे, विकासाची वाट न्यूज वार्ताहर)

धुळे (वार्ताहर) : शाळा उघडल्या आणि बालकांचा किलबिलाट सुरू झाला.गाव, गल्ली गजबजून गेली. शाळाशाळात “शाळा प्रवेशोत्सव” सुरू झाला. धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, गोताणे येथे आगळावेगळा शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.

घरोघरी जाऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांना घरीच कागदी फुलांमध्ये लॉलीपॉप घालून व वर्तमान पेपरच्या टोप्या तयार करून घालून हातात लॉलीपॉप घातलेले फूल देऊन सजवलेल्या बैलगाडीत बसवून सन्मानाने शाळेत आणले.
याप्रसंगी संपूर्ण गावात आनंदासह भावनिक वातावरण तयार झाले होते.आमच्या नात/नातूला आज घरापर्यंत संपूर्ण शाळा आली, अशी भावना एका आजीने बोलून दाखवली. गावात कधी नाही, असा शाळा प्रवेश उत्सव आणि त्याबरोबरच जगदीश परदेशी यांचे कलात्मक आवाहन यालाही पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कालपर्यंत English medium ला जाणारी 2 विद्यार्थी मराठी शाळेत दाखल झाले. शाळेला भेट देणाऱ्या पर्यवेक्षिका अश्विनी बोरसे यांच्या हस्ते गेटवर फुगे देऊन स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन अध्यक्षा ज्योतीबाई यांनीही मुलांचे स्वागत औक्षण व फुगे देऊन केले तसेच मुख्याध्यापक झुलाल पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला फुगे देवून स्वागत केले .


नवागतांचे स्वागत प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण रुखमा पाटील यांनी केले व ज्योतीबाई पुंडलिक परदेशी यांनी रांगोळी, प्रत्येक वर्गाला तोरण बांधली . ज्योती फुलचंद यांनी पाऊल ठसे व वंदना वेंडाईत यांनी हाताचे ठसे व गेटसमोर रांगोळी काढली. विजय देवरे यांनी फलकलेखन केले व युवा प्रशिक्षक रत्नाकर मासुळे यांने सर्व तयारी मदत केली . उपस्थितांच्या हस्ते कपडे, बुट, सॉक्स वाटप करण्यात आले.




