महिलासामाजिकसांस्कृतिक

मायमाऊली

पूजा पाटील (सामाजिक कार्यकर्त्या, अमळनेर)

उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी असते =आई
संसाराचा गाडा चालवणारी देव्हारातील ज्योत असते=आई

ती जन्माला येतानांच घेऊन येते प्रेम व माया ती=आई
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया ती=आई

कधी मुलगी, कधी पत्नी,तर
कधी आई होत असते =आई
सासर, माहेर उजळणारी दोन्हीकडील पणती मधील ज्योत असते ती=आई

आदिशक्ती तू,झाशीची राणी तू,मावळ्याची भवानी तू=आई
प्रयत्नानां लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू,आई

आई म्हणजे जन्मदाती
आई म्हणजे संस्कृती
विधात्यांची सर्वात सुंदर
निर्मिती म्हणजे =आई

घराची सुगरण आवर सावरणारी असते =आई
शौर्याने, धीराने लढणारी आई
प्रत्येक परिस्थितीत खंबीर आधार देणारी=आई

सर्वाच्या भावना,अपेक्षा जपणारी=आई
स्वतःपेक्षा दुसर्‍यासाठी जगते ती=आई
कठीण प्रसंगी मनाने मजबूत व कठोर असते=आई

घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत ती=आई
तरीही न थकता आवरते आनंद देते ती=आई

थकून ,भागून स्वतःमध्ये न अडकता घरात राबराबते, कष्ट
करते ती=आई
प्रत्येक नात प्रामाणिक पणे निभावणारी असते ती=आई

हसरे दिसते अंगण त्यावर नक्षीदार काढते रांगोळीच ती=आई
चार भिंतीत घरपण देणारी भाग्यलक्ष्मी असते =आई

सर्वाच्या भावना,मन,सुखदुःख
नातीगोती समजून घेते =आई
पण तिला कोणीही समजून घेत नाही ती असते=आई

नात्याचा प्रवास तिचा कधीच संपत नाही ती=आई
अशा या माय माऊलीला सुखी ठेव देवराया
जन्मोजन्मी अशीच दे मला आई

(कवियत्री पूजा पाटील या अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!