जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियंका उबाळे यांच्यासह इलंदा फाउंडेशन, प्रजापिता ब्रम्हकुमारी सेंटरचा पुढाकार

उत्तम कांबळे यांची उपस्थिती
नाशिक (वार्ताहर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्रिम्बकेश्वर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियंका उबाळे यांच्या पुढाकाराने नाशिक येथील इलंदा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, मा. संपादक उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला होता. सामाजिक कार्यकर्त्या आणि उपक्रमशील शिक्षिका लता कांबळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
इलंदा फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी
इलंदा फाउंडेशनतर्फे आदिवासी मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. सामाजिक वनीकरण विभाग, त्रिंबकेश्वर कार्यालयामार्फत त्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले तसेच कॉम्पुटर टेबलदेखील देण्यात आला.
ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयातर्फे 85 फुटांचे शिवलिंग
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या पुढाकाराने पेगलवाडी (त्रिंबकेश्वर) येथे 85 फूट उंचीचे भव्य शिवलिंग उभारण्याचे काम हाती घेतेले असून या परिसरात औषधी वृक्ष तसेच उपयोगी फळझाडे लावण्यात आली. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियंका उबाळे, के. एस. गायकवाड वनपाल, के. के शिंदे, वनपाल, श्रीमती डी टी. रोकडे, श्रीमती व्ही व्ही घुटे, चिंतामण तरवारे आदी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.






