महात्मा फुले विकास मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार सीमा हिरे तसेच उद्योजक अनिल जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन

नाशिक – येथील गोविंदनगर परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार सीमा हिरे तसेच उद्योजक अनिल जाधव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सगर सांस्कृतिक भवनात आयोजित रक्तदान शिबिरात पंचवीसहून अधिक रक्तदात्यांना रक्तदान केले. निवृत्त अभियंता राजेंद्र शिरवाडकर यांनी रक्तदान शिबिराचे संयोजन केले.
महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत खैरनार, उपाध्यक्ष श्यामराव मानकर, मंडळाचे सचिव श्रीराम जाधव, पोलिस विभागातील अधिकारी विजय लोंढे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मंडळातर्फे आयोजित उपक्रमासाठी अर्पण रक्तपेढीच्या टीमने पुुढाकार घेतला होता.
महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळातर्फे आयोजित उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मंडळातर्फे आगामी काळातही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
:: अनिल जाधव, ज्येष्ठ उद्योजक, नाशिक






