
नाशिक (वार्ताहर) – येथील किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलची विद्यार्थिनी शिवानी सचिन पवार हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. टीडीके कंपनीच्या सेवेत असलेले सचिन पवार यांची कु. शिवानी ही कन्या असून तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवानीला आईवडील, आजीआजोबा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.



