धार्मिकमहाराष्ट्रविशेषसामाजिकसांस्कृतिक

जैन धर्मातील चक्रवर्ती विवाहास उत्तर महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद

सतीश जैन - लग्नानंतर नवदामपत्यास सात दिवस राहावे लागते ब्रह्मचर्य

धुळे (नितीन इंगळे, जिल्हा प्रतिनिधी)

धुळे (वार्ताहर) – जैन धर्मात विविध गावात चक्रवर्ती विवाहात पहावयास मिळते. भारतातील प्रत्येक प्रदेशात स्वतःच्या काही खास परंपरा आणि चालीरीती असून त्या स्थानिक लोकांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. अनेक ठिकाणी लग्नाबाबत खास प्रथा असतात. मात्र काही परंपरा इतक्या अनोख्या असतात की, त्याबद्दल एकुन अथवा वाचून लोकांना उत्सुकता असते. अशीच एक त्याग, संयम ,धार्मिक पूजा, पाठ, अभिषेक, ब्रह्मचर्यांची अनोखी परंपरा जैन धर्मात विविध गावात चक्रवर्ती विवाहात पहावयास मिळते. लोक या परंपरेचे पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने पालन करतात. लग्नानंतर या काळात नवदांपत्य सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करतात. जैन धर्मातील चक्रवर्ती विवाहास खान्देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चक्रवर्ती विवाह ही जैन धर्मातील एक प्राचीन आणि पारंपरिक विवाह प्रथा आहे, जी साधेपणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शुद्धतेवर आधारित आहे. या विवाह सोहळ्यात काही विशिष्ट विधी केले जातात, ज्यात सात दिवस ब्रह्मचर्य पाळणे, जैन मंदिरात भगवान के अभिषेक, शांतीधारा, पूजन, हवन आणि सात फेरे घेणे इत्यादींचा समावेश असतो. 

अशी आहे चक्रवर्ती विवाह पद्धत

  • धार्मिक विधी : हा विवाह जैन मंदिरात केला जातो आणि त्यात विविध धार्मिक विधी जसे की शांतीधारा, पूजन, हवन आणि सात फेरे घेणे यांचा समावेश असतो. 
  • ब्रह्मचर्य पालन : विवाहानंतर वधू आणि वर यांना सात दिवसांपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. 
  • शुद्ध भोजन : या विवाहादरम्यान, वर-वधू शुद्ध आणि सात्विक भोजन घेतात. 
  • अध्यात्मिक महत्व : हा विवाह जैन तत्त्वांनुसार, अध्यात्म आणि साधेपणावर भर देतो आणि जैन आदि पुराणात याचे वर्णन आढळते

समाजातील लोकअशा प्रथांना केवळ आदर्श मानत नाहीत तर भविष्यातील पिढ्यांना ते टिकून ठेवण्यासाठी प्रेरीत करतात. या विवाहाविषयी जैन धर्मातील महापुराण आणि उपासक ध्याय अंग आदि शास्त्रग्रंथात धार्मिक विवाहाचे वर्णन केलेले आहे. चक्रवर्ती विवाह ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती काही कालांतराने आजपर्यंत लोप पावलेली होती.

प.पु. आचार्य विद्यासागरजी महाराजांचे परमशिष्य प.पु. सुधासागरजी मुनीश्रींच्या प्रवचनातून चक्रवर्ती विवाहाचे वर्णनाने भक्तगण प्रभावित होऊन ही परंपरा उत्तर महाराष्ट्रात पुनश्च सुरू झालेली दिसून येत आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चिंचपाडा ,कुसुंबा ,पनवेल, धुळे चोपडा, सोनगीर ,मांगीतुंगी, शेंदुर्णी, मुंबई आधी गावात चक्रवर्ती विवाह संपन्न झालेत .ही विवाह पद्धती आदर्श असून त्या पद्धतीचे सर्वांनी अनुकरण करावे चातुर्मासानंतर अनेक विवाह इच्छुक चक्रवर्ती विवाह करणार असल्याचे समाज बांधवात एकच चर्चेस उधाण आलेले असून दिसून येत आहे. विवाह विधी पूजा पाठ पं. शैलेश जैन विशेष रूपाने संपन्न करीत असतात. चिंचपाड़ा राहुल रवीन्द्र जैन, अतुल जैन, जीनचंद जैन, नयना जैन ,स्नेहा जैन आदींसह समाजबांधव या विवाहासाठी विशेष परिश्रम घेत आहे .

सध्या संपन्न होत असलेले विवाहांपैकी ८०% चक्रवर्ती विवाह संपन्न झाल्याचे दिसून येत आहेत, समाजातील परंपरा हा केवळ कर्मकांड नसून प्रेम श्रद्धा आणि सामुदायिक बंधनाचे प्रतीक आहे.

– सतीश वसंतीलाल जैन, सामाजिक अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार, कुसुंबा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!