अंध महिला भगिनी आणि कर्तव्यदक्ष सेविकांचा सन्मान
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, नाशिक विभागच्या वतीने आयोजन



नाशिक – स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून ती समाजाच्या संघर्षाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, नाशिक विभाग’ यांच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात समाजातील अंध महिला भगिनी आणि कर्तव्यदक्ष सेविकांचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश प्रवक्ते, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी होते. याप्रसंगी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व्यंकटेश मोरे, ज्येष्ठ नगरसेविका सीमाताई रंजन ठाकरे, केंद्रीय उपाध्यक्ष अनुप खैरनार, विभागीय पदाधिकारी राजभाऊ पाठक, अजित कुलकर्णी, Nfbm चे उपाध्यक्ष संजय घोडेराव प्रकल्प संचालक दत्तु बोडके कार्यकारणी सदस्य राजाराम गायकवाड नवनाथ शेळके, विजय खंदारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या संघर्षाला आणि सेवेला दाद दिली. डोळ्यांनी जग पाहू शकत नसूनही अंतर्मनातील प्रकाशाने स्वतःचे आयुष्य घडवणाऱ्या अंध भगिनींची दखल जेव्हा या व्यासपीठावर घेण्यात आली, तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.

पस्थित सर्वांचे डोळे पाणावले.टनेने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने महिला दिनाचे सार्थक करणारी ठरली. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर अंध महिला भगिनींच्या आयुष्यातील संघर्षाला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “समाजातील दुर्लक्षित पण ध्येयवादी घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. कर्मचाशिका विभागातील एस.टी. नागरिकांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. हा सोहळा केवळ सत्कार सोहळा न ठरता माणुसकी आणि कृतज्ञतेचा एक अनोखा उत्सव ठरला.





गोशाळेसाठी चारा दान करण्याचे आवाहन…!
भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा अतिशय पवित्र मानली जाते… गोमातेची सेवा करणे, हे आपले कर्तव्य आहे.
गोशाळेसाठी चारा दान करणे, हे एक पुण्याचे काम आहे. आपल्या दानाने सत्पात्री दानाचे महत्व नक्कीच सद्गुरूंची सेवा आहे…!
🍁 चारा दान करण्याचे फायदे:
- गोमातेची पूजा म्हणजेच पुण्यकर्म.
- गोशाळेचे काम अधिक प्रभावीपणे होईल…
चारा दान करण्याचे प्रकार: - गवत, भूसा, धान्य आणि अन्य चारा दान करू शकता. (शिजवलेले अन्न नकोय)
- गोशाळेसाठी आर्थिक दान करू शकता.
- गोशाळेच्या कामात सहभागी होऊ शकता.
🍁गोशाळेचे फोन नंबर: 8888947979, 9637523284, 7720030574.
गोशाळेत संपर्क: 🍁 - गोशाळेचे नाव : श्रीकृष्ण गोशाळा…
- गोशाळेचे स्थान : श्रीकृष्ण गोशाळा… जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, गोवर्धन शिवार, नाशिक : 422 222. (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖ - फोन पे आणि गुगल पे :
- 8888947979



