आरोग्यआर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तदेश-विदेशधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

वृद्धापकाळ आनंदात घालवायचा असेल तर…

नाशिकमध्ये उभं राहिलाय वृद्धांसाठी क्लब...

आयुष्य एका टप्प्यावर आल्यानंतर नोकरी आणि पैसा यासाठीची दगदग थांबवण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला एका वळणावर थांबावेच लागते. आपण आपल्या भवतालचा विचार केला तर, अनेक ठिकाणी घरं खूप मोठी असतात पण त्यात राहणारी माणसे केवळ दोनच. तीही वृद्ध कोणाचाही आधार नसलेली. या चक्रात स्वतःचे शरीर तुम्हाला थांबायला भाग पाडते. या काळात सर्वात जास्त गरज परिवार आणि आपल्या जवळच्या माणसांची असते. पण, प्रत्येकाच्याच वाट्याला ते सुखं येत असे नाही. तुमचंही वय झालंय, पहिल्यासारखी कामे होत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते. हा बदल तुम्ही स्वतःच्या आयुष्यात केला तर नक्कीच वृद्धापकाळ कोणाचीही मदत न घेता सुसह्य करणे तुम्हाला सोपे जाईल. या सर्वांचा विचार करून वृद्धापकाळ आनंदी घालवण्यासाठी नाशिकमध्ये वृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब मोठा आधार ठरतोय. या ठिकाणी असलेली व्यवस्था…

जगणं सुंदर करणारा वेगळा प्रकल्प… नाशिकच्या गंगापूर येथील गोवर्धन शिवारात… देशातील पहिलाच अनोखा, आगळावेगळा, नाशिकची नवी ओळख निर्माण करणारा वेगळा प्रकल्प.. वृद्धापकाळ आनंदी होण्यासाठी…

या ठिकाणचे वातावरण मनाला शांतता देणारे… या ठिकाणी आलेल्या वृद्धांकडून सेल्फी काढण्यासाठी लगबग… भजन, गवळण, विटी दांडू, दोरी उड्या, रॅम्पवॉक, गोट्या, सापसीडी, कॅरम, चेस, डान्स, मस्ती, संबळसोबत करावकेवर गायन, संगीताच्या तालावर थिरकणारी पावलं… नृत्यासोबत स्पर्धांमध्ये सहभाग… बक्षिसे जिंकण्यासाठी लगबग… आदी सर्व उपलब्ध करून देण्यात आलंय…  नाशिकच्या अगदी जवळच सुरू झालेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबमध्ये…

🪶 प्रकल्पात रोज येण्याजाण्यासाठी बसेसची व्यवस्था… दोन वेळा चहा-नाश्ता… (अनलिमिटेड मिसळ पाव), दुपारी घरगुती भोजनाची व्यवस्था… सायंकाळी बटाटा वडा… वाचनालय… सिनेमा थिएटर… भव्य हॉल… सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी… प्रती व्यक्ती 400 रुपये शुल्क… दुपारी आरामाची व्यवस्था… प्रत्येक सदस्याचा सन्मानपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार… सोबतच कायमस्वरूपी राहण्यासाठीची व्यवस्थाही उपलब्ध… निसर्गाच्या सानिध्यात… नाशिकचे नाव महाराष्ट्रात नेत ग्रुपने येण्याजाण्यासाठी हक्काचं ठिकाण बनलेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबने…

वृद्धापकाळ आनंदी आणि सुखी करायचा असेल तर नक्कीच नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात सहभागी व्हा… जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे कायमस्वरूपी सदस्य (आजीवन सभासद) होण्याची व्यवस्था विशिष्ट शुल्क भरून करण्यात आली आहे. या विजयांगण स्मार्ट कार्डचा आपण नक्कीच विचार करू शकता…

अशी आहे स्मार्ट कार्डची रचना (स्वरूप) –

विजयांगण स्मार्ट कार्ड सशुल्क असेल.

विजयांगण स्मार्ट कार्ड वैधता ८ वर्षे असेल.

वैध काळात सदस्यांना नियमितपणे क्लबमध्ये येण्याजाण्यासाठी बसेसची व्यवस्था असेल.

रोज मोफत सकाळी चहा व अल्पोपहार, दुपारचे भोजन, सायं.चहा व नाश्ता उपलब्ध असेल.

क्लबतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजनात सदस्यांना मोफत सहभागी करून घेतले जाईल.

शिवसुमन वृद्धाश्रमात मुक्कामी राहणारया सदस्यांना शुल्कात ठरल्याप्रमाणे सूट दिली जाईल.

सदस्यांसाठी वर्षभर मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचे तसेच आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन.

उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या व्याख्यानांचे, सेलेब्रिटींच्या भेटी, सांस्कृतिक महोत्सव आदींसह अन्यही उपक्रमांचे योजन करण्यात येईल.

वृद्धापकाळात अनेक ठिकाणी केअर टेकरकडून होणारी फसवणूक असो वा हाकेला प्रतिसाद देणारी व्यवस्था जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे सुरू करण्यात आलेल्या शिवसुमन आनंदाश्रमात उभी करण्यात आली आहे.

मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने… हे ब्रीद घेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात नक्कीच सहभागी व्हा… उद्याचा दिवस कसा असेल, कोणीही सांगू शकत नाही, मात्र आयुष्याचा प्रत्येक दिवस आनंदी जगण्याचा मूलमंत्र देणारया या उपक्रमात नक्कीच सहभागी व्हा…

पत्ता आहे- जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन वृद्धाश्रम, वंडर झोनजवळ, मुक्त विद्यापीठ रोड, गोवर्धन शिवार, गंगापूर, नाशिक-422 220.

संपर्क क्रमांक – 8888947979, 9637523284, 7720030574.

गोशाळेसाठी चारा दान करण्याचे आवाहन…!
भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा अतिशय पवित्र मानली जाते… गोमातेची सेवा करणे, हे आपले कर्तव्य आहे.
गोशाळेसाठी चारा दान करणे, हे एक पुण्याचे काम आहे. आपल्या दानाने सत्पात्री दानाचे महत्व नक्कीच सद्गुरूंची सेवा आहे…!
🍁 चारा दान करण्याचे फायदे:

  • गोमातेची पूजा म्हणजेच पुण्यकर्म.
  • गोशाळेचे काम अधिक प्रभावीपणे होईल…
    चारा दान करण्याचे प्रकार:
  • गवत, भूसा, धान्य आणि अन्य चारा दान करू शकता. (शिजवलेले अन्न नकोय)
  • गोशाळेसाठी आर्थिक दान करू शकता.
  • गोशाळेच्या कामात सहभागी होऊ शकता.
    🍁गोशाळेचे फोन नंबर: 8888947979, 9637523284, 7720030574.
    गोशाळेत संपर्क: 🍁
  • गोशाळेचे नाव : श्रीकृष्ण गोशाळा…
  • गोशाळेचे स्थान :
    श्रीकृष्ण गोशाळा… जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, गोवर्धन शिवार, नाशिक : 422 222. (महाराष्ट्र)
    ➖➖➖➖➖➖
  • फोन पे आणि गुगल पे :
  • 8888947979

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!