विशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पेठ येथील डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्राचार्य अशोक नंदन यांच्या हस्ते ध्वजारोहण

पेठ – येथील डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन, उपमुख्याध्यापक दिलीप केला, पर्यवेक्षक कैलास देशमुख, नागरिक, पालक आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ विजय बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर प्राचार्य अशोक नंदन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण ब्राह्मणकर जे.आर. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत आणि नृत्य सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी भाषणही केले. संजय सोनवणे यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पठाडे, जनार्दन वाघमारे यांनी केले. विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, वरिष्ठ लिपीक अनिल गांगुर्डे, शरद सोनवणे, अजय वाघ, रोहन ठाकरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!