संघजन प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जुन्या आठवणींना उजाळा रमले athvnit


(अजित कुलकर्णी : विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)
नाशिक : जुन्या आठवणींना उजाळा देत संघजन प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संघजन प्रतिष्ठानच्या वतीने राणी लक्ष्मीबाई सभागृहात अशोक स्तंभ येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वात प्रथम राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका आणि राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती भुतपुर्व अध्यक्षा प्रमिलाताई मेंढे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी काही दिवसांपूर्वी निधन झाले. संमेलनस्थळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना संघजन प्रतिष्ठानच्या वतीने राणी लक्ष्मीबाई सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संमेलनात भाजपा ज्येष्ठ नेते व संमेलनाध्यक्ष विजयराव साने यांनी भाजपा हा आपला परिवार आहे व ह्या परिवारातील कार्यकर्ते यांच्याबद्दल आठवणी व भाजपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य सुखद अनुभव अत्यंत भावनिक होऊन सांगितले.

अभय छल्लाणी, सुनील आडके, योगेश भगत, प्रदीप पाटणकर, प्रकाश दीक्षित आदींनीही जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव सांगितले. एकोपा वाढणे, एकमेकांशी संबंध दृढ होणे, मैत्री, विश्वास निर्माण होणे यासारख्या गोष्टी संमेलनातूनच साध्य होतात
व सर्वांनी एकजुटीने रहावे असे संमेलनाध्यक्ष विजयराव साने यांनी सांगितले. राज्य परिषदेवर संघजन प्रतिष्ठानचे श्री अभय छल्लाणी, योगेश भगत व सुजाता करजगीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विजयराव साने यांचा सत्कार प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मधू दीक्षित यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांचा सत्कार नरेंद्र सोनवणे यांचे हस्ते करण्यात आला. भाजपा नेते सुनील आडके यांचा सत्कार वासुदेव रोहनकर यांचे हस्ते करण्यात आला. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचा सत्कार माजी नगरसेवक योगेश हिरे यांचे हस्ते करण्यात आला. भाजपा नेते महेश हिरे यांचा सत्कार गेहलोत यांचे हस्ते करण्यात आला. प्रदीप पाटणकर यांनी गुलाब फुलगुच्छ देऊन राज्य परिषद सदस्यांच्या सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी सुहास चिपळुणकर, नरेंद्र सोनवणे, प्रकाशशेठ कुलकर्णी, वासुदेव रोहनकर, प्रकाश जेजुरकर यांनी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले. संमेलनास संघजन प्रतिष्ठानचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.




