आरोग्यआर्थिकज्येष्ठ नागरिक वृत्तमहिलाविकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

पतीची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या दोन केअर टेकरनी वृद्ध महिलेला साडेपस्तीस लाखांना फसवले

ज्येष्ठ नागरिकांना आवाहन : घरी केअर टेकर नेमताना काळजी घ्या

पिंपरी – आयुष्यभर खस्ता खावून वृद्धापकाळात आधार म्हणून राखून ठेवलेल्या रकमेची जर चोरी झाली तर होणारे दुःख खूप मोठे असते. पतीच्या आजारपणात त्यांची देखभाल करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिलेने नेमलेल्या दोन केअर टेकरने बनावट सह्या तसेच एटीएमचा वापर करून ज्येष्ठ नागरिक महिलेची सुमारे साडेपस्तीस लाख रुपयांना फसवणूक करण्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


घटनेची सविस्तर माहिती अशी, पुण्याच्या पाषाण परिसरातील एका ज्येष्ठ नागरिक महिलेने आपल्या पतीच्या वृद्धापकाळात त्यांची देखभाल करण्यासाठी दोन केअर टेकरची नियुक्ती केली होती. दोन्ही केअर टेकरने ज्येष्ठ नागरिक असलेल्या घरातील धनादेश चोरून व त्यावर परस्पर बनावट सह्या करून तसेच एटीएम कार्डवरून पैसे काढून तब्बल 35 लाख 51 हजारांची फसवणूक केली आहे. या घटनेने फसवणूक झालेल्या पाषाण भागातील गिरिजा चंद्रन यांनी (वय वर्षे 70) चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्यात दाखल केली. याबाबत पोलिस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने मात्र ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर ठेवावेत की नाहीत, असा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो.


ज्येष्ठ नागरिकांनो… केअर टेकर ठेवताना काळजी घ्यावी…

यापूर्वी घडलेल्या घटनांचा संदर्भाने नाशिकच्या जय शंकर विजयांगम सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे जनहितार्थ आवाहन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी केअर टेकर नेमताना त्याची पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय केअर टेकर ठेवू नका. मुंबईतील घटनेत तर या कुटुंबाशी संबंधित आठ ते नऊ वर्षांपासून सेवा देणाऱया महिलेनेच एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची सुमारे साडेसहा कोटींची संपत्ती हडप केल्याची घटना घडली होती. वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन नाशिकसह अन्य ठिकाणीही वेगवेगळ्या बातम्या अथवा आवाहन करून नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठांना काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात येते आहे.

नाशिक शहरात खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा ओळखून, वार्धक्यातील त्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने आधुनिक पद्धतीने घरे तयार करून ज्येष्ठांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक शहराच्या अगदीच जवळ असलेल्या गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रस्त्यावर सुमारे एक एकरावर शिवसुमन आनंदाश्रमाची उभारणी करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांची पूरेपुर काळजी इथे घेतली जाते आहे. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होवू नये, उतारवयात त्यांची आर्थिक वा मानसिक कुचंबणा थांबावी, त्यांची फसवणूक टाळण्यासाठी जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमासारखे विश्वासार्ह आणि आधार देणारे प्रकल्प नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरताहेत.

पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, केअर टेकर नेमताना कृपया काळजी घ्यावी, मावळतीकडे झुकलेल्या आयुष्याला आनंदी करत असताना अशा घटनांपासून दूर राहावे, संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय केअर टेकर नेमू नका, पोलिसांतर्फे करण्यात येणाऱया आवाहनाला प्रतिसाद देवून पूर्वकल्पना आपल्या परिसरातील पोलिस यंत्रणेला कळवावी, म्हणजे अडचणी निर्माण होणार नाहीत.

नम्र आवाहन, आपणही आपले 13 रुपये सत्पात्री दान आपल्या सोयीने वृद्धाश्रमाला देवू शकता…

नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास आपणही 13 रुपयांची मदत करू शकतात.

आपल्याला स्वेच्छेने सामाजिक कार्यासाठी 13 रुपये दान करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता.

आपली 13 रुपयांची मदत देण्यासाठी क्यूआर क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!