नाशिक कुंभमेळाविशेषशहरसामाजिक

आई माझी सांगत होती…

चंद्रभान ठाकरे (मु. पो. गणूर, ता.चांदवड) प्रयोगशाळा सहा., क.का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत

आई माझी सांगत होती तिच्या आयुष्याचं रडगानं .
कपाळाचे बाशिंग सुटले तसे
तिचे धाव धाव धावने धाव धाव धावणे.

आई माझी काबाड कष्ट करत होती.
तरीही भाकर मिळत नव्हती पोटापुरती.
भाकर मिळत नव्हती पोटावरती,
आणि जेवताना माझं झालं झालं म्हणत होती.
आणि आमच्या पुढे चतकोर चतकोर वाढत होती.
तिच्या नशिबातच लिहिले होते काबाड कष्ट देवाने.
उपवासाला तिला कधीच मिळाले नाही साबुदाणे.
पण एक हौस मात्र माझ्या आईने जरूर केली.
दोन साड्या एकत्र करून नेसण्याची फॅशन आता आली.
ती हाऊस माझ्या आईने मात्र पन्नास वर्षांपूर्वीच केली.
(गरीब परिस्थितीमुळे दोन-तीन लुगड्यांचा चांगला चांगला भाग काढून तो एकत्र शिवून ते लुगडं नेसणे)
आई माझी कधीच नाही गेली गावागवत्रिला.
नाही केला कधी देव धरम.
तिच्या नशिबातच लिहिले होते रोजचे मरण.
आई माझी काय काय यातना सोसत होती.
पण मी थकले असं कधीच म्हणत नव्हती.
असा असा होता तिच्या पायात जोर.
लहानपणी कळलेच नाही तिच्या कष्टाचे मोल.
आई माझी फाटकी चोळी घालत होती.
चोळ्यांना दोन दोन ठिगळे लावत होती.
आणि पोरांना कपडे घ्या पोरांना कपडे घ्या.
असा ढोशा बापाला लावत होती.
लहानपणी आम्हीही इतके होतो स्वार्थी.
तेव्हा कळलीच नाही तिच्या जगण्यातील विसंगती.
तिच्या जगण्याची महती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!