Uncategorized

जयभीम सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश

साक्री तालुक्यातील जि.प.शाळा जयभीम सोसायटीचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम

भिलाजी जिरे (साक्री प्रतिनिधी)

साक्री (प्रतिनिधी) – फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथ.शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच अंतिम निकाल जाहीर झाला. (इ.5 वी शिष्यवृत्ती) या परीक्षेत जि.प.जयभीम सोसायटी शाळेचा 100% निकाल लागला असून चि.मी नितीन पानपाटील हा विद्यार्थ्यी जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम तसेच कु. प्रज्ञा ज्ञानेश्वर नागमल ही विद्यार्थ्यीनी जिल्हा गुणवत्तायादीत 5 वी येऊन जि.प.शाळेची व साक्री तालुक्याचे उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सन 2017 मध्ये श्री श्रीकांत धामणे हे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जि.प.शाळा जयभिम सोसायटी येथे रूजू झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मागील सलग 6 वर्षापासून जि.प.शाळा जयभिम सोसायटी या शाळेचा दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत 100% निकाल लागत असून दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यी जिल्हा गुणवत्तायादीत येऊन त्यांची उच्च शिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतन धुळे येथे निवड होत आहे दर वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तायादीत येण्याची यशस्वी परंपरा सुरु कायम राखली आहे….
विशेष या वर्षी शासकीय विद्यानिकेतन, धुळे येथील SSC परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी चि.शंकर गुलाब बच्छाव हा विद्यार्थ्यी जि.प.शाळा जयभिम सोसायटी चा माजी विद्यार्थ्यी असून 2021 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्तायादीत येऊन त्याची शासकीय विद्यानिकेतन, धुळे येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली होती. यशस्वी सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्रीकांत धामणे यांचे मुख्याध्यापक देविदास गांगुर्डे, केंद्रप्रमुख योगेश्वर निकवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्रसिंग झाल्टे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रथा, परंपरा, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा… त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!