आर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

जायगाव (सिन्नर) येथील एसएसके महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

क्रिकेट फक्त खेळ नव्हे, स्वभाव घडविणारा शिक्षक : डॉ. गिरीश पाटील

सिन्नर (प्रतिनिधी) : जीवन एक सामना आहे, मैदानावर घडते तेच आयुष्यात वेगवेगळ्या रूपात घडते . यश, अपयश, संयम, संघभावना हे सगळं क्रिकेट शिकवते. खिलाडू वृत्ती आपल्यात जोपासली गेली पाहिजे . यश आणि अपयश दोन्ही पचविता आली पाहिजे . खेळाडू एखाद्या योध्याप्रमाणे असावा. हरला तरी पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहून खेळणारा, असे प्रतिपादन डॉ . गिरीश पाटील यांनी केले .

जायगाव (सिन्नर ) येथील एस एस के महाविद्यालयात डॉ . बाबासाहेब जयकर व्याख्यान मालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते, या वेळी धनलक्ष्मी शिक्षण संस्थचे अध्यक्ष डॉ .कुणाल कातकाडे , एस एस के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .के .टी .खैरनार कार्यवाह प्रा वागले सर उपस्थित होते . सावित्रीबाई फुले पुणे

विद्यापीठ पुणे , बहिःशाल शिक्षण मंडळ आणि एस एस के महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ . बाबासाहेव जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते . ” क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट ” या विषयावर डॉ गिरीश पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि फुलहार अपर्ण प्रमुख अतिथींनी केले . प्रमुख वक्ते डॉ . गिरीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला .त्यांचा परिचय करून दिल्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यंना मार्गदर्शन केले . क्रिकेट आणि जीवनातील प्रसंगातील साधर्म्य कसे आहे . विविध उदाहरणासह पटवून दिले . विद्यार्थी आता पॉवर प्ले मध्ये आज आहेत त्यांनी फलंदाजासारखे फटकेबाजीने खेळावे . संयम , शिस्त आणि प्रचंड मेहनत करावी असा हि सल्ला डॉ गिरीश पाटील यांनी दिला . आभार प्रा महाजन यांनी व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा पानसरे , प्रा . थोरात प्रा जाधव प्रा खुर्चे मॅडम प्रा आव्हाड मॅडम यांनी प्रयत्न केले.

आपणही गोशाळेसाठी गायींना चारा दान करू शकता… आपण दिलेली मदत नक्कीच योग्य ठिकाणी दान असणार आहे. QR कोडचा वापर करून किंवा आपण स्वतःही भेट द्यावी… आपली मदत म्हणजे सामाजिक कार्याला बळकटी देणारी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!