संपूर्ण भारतात फक्त श्रीक्षेत्र नाशिकमध्ये एक वेगळा प्रकल्प
अंतर्नाद : सावळीराम तिदमे, ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार, नाशिक.



अशी एक संकल्पना 🌴
असा एक प्रकल्प 🪻
असा एक प्रयोग 🪸
असं अन्यत्र कुठेच नाही .🔥
कोणीच केलं नाही .🤷♂️
जे श्रीक्षेत्र नाशिक मध्ये आहे .🕉️🌄
सगळया नाशिककरांना माहित नाही .
सगळ्या नाशिककरांनी पाहिलं नाही अन् अनुभवलं नाही . राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही माहित नाही . लिखित , दृष्य व श्रवणीय माध्यमांनी सुध्दा ज्याची दखल घेतली नाही . दररोज हजारो सुहृद ज्याच्या जवळून ये जा करतात पण त्यांनी सुध्दा कधी जिज्ञासेने त्यासंदर्भात चौकशी केली नाही . अत्यंत बारकाईने , अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक , कलावंत , ज्ञानवंत , गुणवंत , पत्रकार , समीक्षक , संपादक , अभिनेते , समाजसेवक , लोकप्रतिनिधी , सिनेकलावंत , सेलिब्रिटी , जनसामान्य , मंत्री , प्रशासकीय अधिकारी , शिक्षक , प्राध्यापक , प्राचार्य या स्वरूपातील विविध समाजघटकांनी दखल न घेतलेलं एक विशेष स्थान म्हणजे 🌻🥗जयशंकर विजयांगण , सिनियर सिटीझन क्लब , वंडरझोन शेजारी , मुक्त विद्यापीठरोड , गंगापूर गावाजवळ , श्रीक्षेत्र नाशिक. संपर्क : ८८८८९४७९७९, ९६३७५२३२८४. ७७२००३०५७४.


नातवंडे , मुले मुली व आजी आजोबा असं संपूर्ण कुटुंबाने हा अभिनव प्रकल्प आवर्जुन बघावा . या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून सर्व दालने , दालनांच्या भिंती अद्भूत अक्षरधनाने रंगलेल्या आहेत . प्रत्येक अक्षर , शब्द , वाक्य व फलक म्हणजे मानवी जीवनाची माहिती , ज्ञान , विज्ञान , तत्त्वज्ञान व आत्मज्ञानाचे अलौकिक दर्शन आहे . वाचावं , समजून घ्यावं , विचार चिंतन मनन करावं . सर्वस्पर्शी जीवनगीता इथं योजनाबध्द साकार झाली आहे . प्रत्येक फलक आणि भिंत म्हणजे बोधामृताची गंगा आहे .

कवी , गझलकार , कथालेखक , सूत्रसंचालक , लेखक , साहित्यिक , रसिक यांच्या मनबुध्दीसह प्रतिभा व प्रज्ञेला अंकुर फोडणारे जीवनानंदी अक्षरधन आपल्याला साद घालतंय . किमान एकदा तरी मानवता व माणुसकीचे झरे देह मंदिरात जागृत व प्रवाही करणाऱ्या या बहुगुणी व आत्मानंदी कलाकृतीचं दर्शन घ्यायलाच हवं .

सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कृपेने एका समर्पित भक्ताच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या सजगता , सहृदयता , सच्चाई , अच्छाई, कृतज्ञता या भावभावनांचा सगुणसाकार आविष्कार म्हणजे जयशंकर विजयांगण . हे हॉटेल , भोजनालय , रेस्टॉरंट , ढाबा असं काहीच नाही . पण मानवी जीवनाचा अर्थ सांगणारं , माणसाला जीवनभान , आत्मभान करून देणारं बहुरंगी सेवालय आहे . या अद्वितीय संकल्पना व प्रकल्पाच्या कणाकणात आणि सर्वांगात सकारात्मक उर्जेचे , चैतन्याचे अखंड प्रवाह आहेत .जीवनाचे आकाश अन् प्रकाश इथं आहे . इथं आलेली व्यक्ती , कुटुंब व समुह भरभरून मनःशांती ,प्रसन्नता , उत्साह , आत्मिक समाधान व आनंदाची दौलत घेऊन जातो , पुन्हा पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतो . कारण या प्रकल्पात जे आहे ते शब्दात मांडता येत नाही . त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हीच मेजवाणी व उपहार. ग्रुपने येण्याजाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येते. अतिशय नाममात्र शुल्क आकारले जाते. याच ठिकाणी श्रीकृष्णा गोशाळा साकारण्यात आली आहे. अध्यात्मिक वातावरण असलेल्या या प्रकल्पाला नक्कीच ग्रुपने भेट द्या… संपूर्ण दिवसाचा आनंद घेण्यासाठी इथे आवर्जून येणार असाल तर संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

विजयकुमार इंगळे या बेधुंद झपाटलेल्या युवकाची कल्पकता , संकल्पना , योजना यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेला हा विलक्षण प्रेरणादायी प्रकल्प म्हणजे श्रीक्षेत्र नाशिकसह महाराष्ट्राची शान आहे . वर्तमानात अशा मानवता , माणुसकी , सच्चाई , अच्छाई , कृतज्ञता , सहयोग , सर्मपण अशा दिव्य भावांची , सद्गुणांची उजळणी इथं प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. या ठिकाणी असलेल्या शिवसुमन आनंदाश्रमात कायमस्वरूपी राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून सर्व सोयींनी युक्त परिसर आहे.



संपूर्ण कुटुंब घेऊन जयशंकर विजयांगणचा आस्वाद आणि आनंद लुटायलाच हवा . प्रारंभीच सद्गुरू शंकर महाराजांच्या दर्शनाने अंतरंग पुलकित होतात .मेधा , प्रतिभा व प्रज्ञा यांच्यासाठी इथं इंधन आहे . फक्त जिज्ञासू बनून या अन् प्रकल्पाच्या सर्वांगाचे रसग्रहण करा . तुमची दृष्टी ,वृत्ती व अंतरंगात सकारात्मक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही . मग विलंब कशाला !
🌄👑🪻🌾🪷🇳🇪🚩
॥चलो जयशंकर विजयांगण ॥
स्वतःला रिचार्ज , रिफ्रेश, सकारात्मक व आत्मानंदी करण्यासाठी .

लेखक : सावळीराम तिदमे
८००७९७५७६० .
(लेखक सावळीराम तिदमे हे ज्येष्ठ पत्रकार, मार्गदर्शक असून पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तिदमे यांनी विविध संस्थानी पुरस्कारांनी गौरवले आहे.)



