आरोग्यआर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसांस्कृतिक

डॉ. हर्षद सोनवणे यांची “एम.डी. रेडिओलॉजी” शिक्षणासाठी निवड

डॉ.हर्षद सोनवणे नीट पीजी परीक्षेत अव्वल

पिंपळनेर (सुभाष जगताप, प्रतिनिधी) : सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर सोनवणे व सटाणा नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष ज्योती सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. हर्षद सोनवणे यांनी सन २०२५ मध्ये घेतलेल्या नीट पीजी परीक्षेत अव्वल स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ. हर्षद यांची अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. रेडिओलॉजी या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यांनी पुणे येथे एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर नीट पीजीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले होते.
त्यांच्या या यशामुळे सटाणा शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोनवणे कुटुंबीयांच्या या यशाबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!