आरोग्यमहाराष्ट्रमहिलासामाजिक

नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टर आणि दोषी मद्यधुंद कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांकडून चोप

आदिवासी गर्भवती महिला दिवसभर रुग्णालयात बसून, घटनेने खळबळ

मनमाड (वार्ताहर) : नांदगाव येथील दारूच्या नशेत धूत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमुळे बाळंतपणासाठी आलेल्या आदिवासी महिलेला दिवसभर रुग्णालयात उपचारासाठी बसून राहावे लागले. दिवसभर बसून असलेल्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.


दिवसभर ताटकळत बसलेल्या आदिवासी महिलेला नंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला, या काळात घडलेला प्रकार शिवसैनिकांना कळल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टर शांताराम राठोड आणि मद्यधुंद कर्मचाऱ्यांना चोप दिला.


घटनेची माहिती समजल्यावर उपस्थित झालेल्या पोलिस प्रशासनाकडे संबंधित आदिवासी महिलेच्या नातेवाईकांनी यातील दोषींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत संताप व्यक्त केला.
नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून मद्यधुंद डॉक्टर आणि ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोषी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले, त्यानंतर शिवसैनिकांचा राग कमी झाला.

घटनेची अधिक माहिती अशी, नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील सोनाली आकाश मोरे ही आदिवासी महिला दिवस पूर्ण झाले म्हणून बाळंतपणासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पहाटेच उपस्थित झाली होती. डॉक्टरांनी प्रसूतीबाबत तपासणी करत थांबून राहण्याचा सल्ला दिला. मात्र प्रसूती वेदना होत असतानाही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. याबाबत माहिती समजल्यावर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी शिवसैनिकांसह ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिलेची परिस्थिती पाहून शिवसैनिक संतापले. मद्यधुंद डॉक्टर आणि कर्मचारी पाहून त्यांना चोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!