आईमुळेच पुर्नजन्म मिळाला… एकाच जन्मात दोन वेळा जग पाहू शकली…
नीलिमा संबुस (गंगापूर रोड, नाशिक)

ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई… देवाला सगळ्याच्या घरी एकाच वेळी रहाता येतं नाही म्हणून देवाने आई बनवली आणि सर्वांना दिली. अगदी तिच्यापोटी जन्म घेऊन या धरणीवर पहिलं पाऊल ठेवण्याचा हक्क दिला तो आईमुळेच…

माझ्या आईने खूप खडतर परिस्थितीत आमचे संगोपन केले. आमचे शिक्षण करून चांगल्या कुटुंबात माझे लग्न करून दिले. लहान मोठ्या दुःखदप्रसंगी सतत खंबीरपणे पाठीशी उभी राहीली.
दोन वर्षांपूर्वी माझे कुटुंब म्हणजे माझे मिस्टर, मुलगी व नातू देव दर्शनाला जात असतांना आमच्या गाडीचा जबर अपघात झाला.
या गंभीर अपघातात मिस्टर व नातू जागीच गतप्राण झाले आणि मी तर बेशुद्धच होते. त्या काळात आईनेच माझी संपूर्ण काळजी घेतली. मी शुध्दीवर आल्यानंतर मला सावरले. मानसिक आधार दिला. मी बेडरिडन असल्यामुळे मला खाऊ घालण्यापासून सगळी कामे आईनेच केलीत.
आईमुळेच आज मी जग पाहू शकत आहे. म्हणूनच. म्हणते माझ्या आईने मला दोन वेळा जन्म दिला. आजही ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे.
कशी होऊ उतराई…
उपकार तुझे फिटणार नाही आई…

आई आपल्या शरीराची च नाही पण हृदयाची मालकीन असते आणि आपल्या पित्याची अर्धागीणी असते तरी ती कायम एकटी असते कारण ती तीच्या आईला सोडून आपल्या हक्काच्या घरात आपल्या स्वतःच्या परिवारासाठी रात्रंदिवस जागी असते पण स्वतःची वाटणी न मागता लेकरांना वाटणी करून देते ती फक्त आई असते आणि तिची सर कुणा नसते.

माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.
📎लेख पाठवण्यासाठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक : 7720030574
विजयकुमार इंगळे
संपादक
विकासाची वाट न्यूज, नाशिक.



