करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

सारडा कन्या शाळेत ग्रंथालय सप्ताह समारोप व बक्षीस वितरण संपन्न

प्रसिद्ध दिग्दर्शक जयेश आपटे, शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांची उपस्थिती

नाशिक : येथील ना. ए. सोसायटी संचलित मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या शाळा, नाशिक येथे ग्रंथालय सप्ताह समारोप व बक्षीस वितरण समारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक जयेश आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.विशेष अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके हे उपस्थित होते. जयेश आपटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की चांगली पुस्तके जीवन बदलवितात.माणसाला मोठे करतात.त्याने आत्मविश्वास वाढतो.म्हणून नेहमी पुस्तकाच्या सहवासात रहा.स्पर्धेत भाग घ्या.तुम्ही सगळे स्वतः स्वयंभू आहात तुमच्यात चांगले गुण आहेत.खुप अभ्यास करा मोठ्या व्हा.यावेळी त्यांनी तोत्तोचान’ ची गोष्टी सांगून मुलींचे मनोरंजन केले. उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी विद्यार्थिनींना सांगितले की तुम्हाला जेवढी पुस्तके मिळतील तेवढी वाचा.शेजारीच सार्वजनिक वाचनालयाचे बालवाचनालय आहे त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्या असे सांगून उपक्रमाचे व सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.कार्यक्रमाच्याअध्यक्ष व शालेय समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर यांनी वाचनाने कशाप्रकारे समृद्धता येते हे तुम्ही ग्रंथ सप्ताहातील विविध स्पर्धेत भाग घेतल्याने अनुभवले आहे म्हणून अधिक चांगले वाचन करा असे सांगून विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

यावेळी व्यासपीठावर रहाणे ,मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर,ग्रंथपाल अरविंद दिघे,शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण,शाळा समिती सदस्य मंगला निकम,गीतांजली वैष्णव,मोहिनी तुरेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा पल्लवी तिडके आदी उपस्थित होते.मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले ग्रंथालय सप्तहात् घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा आढावा ग्रंथपाल अरविंद दिघे यांनी सादर केला. या ग्रंथालय सप्ताहांत इ.५वी ते १० वी साठी शब्दकोडे, म्हणीची पूर्ती, कथालेखन, चित्रवर्णन, सामान्य ज्ञान लेखी, सारडा स्कॉलर प्रश्नमंजुषा, बातमी लेखन, श्रुतलेखन, अनुवाद चित्ररसास्वाद, मराठी शुद्ध शब्द लिहिणे ,कल्पनाविस्तार पुस्तकाचे मुखपृष्ठ काढणे चित्रकला स्पर्धा इ.स्पर्धात् १७३२ विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.

सरस्वती व ग्रंथपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ओंकार वैरागकर व गीतमंच विद्यार्थिनी यांनी ग्रंथगीत सादर केले. बक्षीस यादीचे वाचन संगीता अंभोरे, योगिता भुसारे यांनी केले.सूत्रसंचालन हर्षदा दळवी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय समिती सदस्यअतुल करंजे,नीलिमा कांबळे,संगीता देशमाने, विवेक पाटील,कलाशिक्षक उमा राठी,अतुल भालेराव,रामदास चव्हाण, हेमंत कडाळे,दिलीप अहिरे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे साहाय्य लाभले कार्यक्रमास विद्यार्थी,शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!