आरोग्यकरिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथे जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांची उपस्थिती

सातपूर : येथील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथे जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ठाकरे यांनी बिरसा मुंडा यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले, बिरसा मुंडा यांचे कार्य आणि त्यांचे देशप्रेम कायम लक्षात ठेवावे असे आवाहन केले.

जननायक बिरसा मुंडा यांनी खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले, इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध त्यांनी दिलेल्या लढा आपल्याला कायम प्रेरणा देत राहील या शब्दात प्रा. ललिता धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना जननायक बिरसा मुंडा यांच्या विषयी माहिती दिली.
यावेळी भरत साबळे, रविदास वसावे, हाबेल गावित, निखिल वळवी, वृषाली वळवी, वैशाली वसावे, प्रियंका वसावे, या सर्व विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!