सुप्रसिद्ध साहित्यिक कुमार अंबुज यांच्याशी मंगळवारी, २३ सप्टेंबरला प्रागतिक चर्चा
सायंकाळी 5.30 वाजता नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे आयोजन


नाशिक : हिंदीतले सुप्रसिद्ध कवी लेखक कुमार अंबुज यांच्याशी प्रगतिक चर्चेचे आयोजन प्रगतिशील लेखक संघ नाशिक युनिटद्वारे हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. कुमार अंबुजी यांना सन 2024 चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुमार अंबुज यांचे साहित्य, त्यांची लेखनाची भूमिका, प्रागतीक चळवळी पुढील आव्हाने, समकाल, हिंदी आणि मराठी भाषा साहित्य लिपी संस्कृती यांच्यातील समान दुवे आणि समन्वय इत्यादी सर्व विषयांवर चर्चा होण्याच्या दृष्टीने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी सायंकाळी हुतात्मा स्मारक येथे खुल्या प्रागतिक चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कादंबरीकार राकेश वानखेडे हे त्यांच्याशी संवाद साधतील.

कुमार अंबुज हे हिंदी साहित्यातले महत्त्वाचे कवी, कथाकार, चिंतक आहेत. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1957 रोजी सतना मध्यप्रदेश येथे झाला. त्यांचे किवाड, अनंतिम, कृरता, अतिक्रमण, अमिरी रेखा हे कवितासंग्रह हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच कथासंग्रह, वैचारिक लेखन ही प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या कविता आणि कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत. ते प्रगतिशील लेखक संघाच्या नॅशनल कौन्सिलचे मेंबर असून प्रगतिशील आंदोलनाशी जोडले गेले आहेत. सरळ भाषा आणि मार्मिक भाष्य हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. शहराचे त्रासदायक जीवनाचे अत्यंत सखोल असे चित्रण त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येते. मानवता, लोकतंत्र, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्य याबद्दल अत्यंत खोल संवेदना व्यक्त करणारे त्यांचे साहित्य आहे.
त्यांच्याशी ही चर्चा खुली असल्यामुळे नाशिक शहरातील अनेक काव्यप्रेमी तसेच प्रगतिशील आंदोलनातील कार्यकर्ते यांना त्यांच्याशी संवाद साधता येईल. कार्यक्रम खुला असून कार्यक्रमास साहित्यिकांनी उपस्थित राहावे असे असे प्रगतिशील लेखक संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रमोद अहिरे आणि सचिव प्रल्हाद पवार ,कार्याध्यक्ष अरुण घोडेराव, पदाधिकारी कॉ. महादेव खुडे, रामदास भोंग कादंबरीकार तुकाराम चौधरी कथाकार संजय दोबाडे, शिल्केशा अहिरे,लता कांबळे, तल्हा शेख यांनी कळविले आहे.




