दिग्वेश राठीला “नोटबुक सेलिब्रेशन” पडले महागात… राठीवर नोटबुक सेलिब्रेशवरून निलंबनाची कारवाई
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची मध्यस्थी

वृत्तसंस्था : दिग्वेश राठीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अभिषेक शर्मावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतच्या वादामुळं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय त्याच्या मॅच फी पैकी पन्नास टक्के दंड म्हणून जमा करण्यात येणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर 5 डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचं निलंबन करण्यात आलं. आधीच दोन वेळा दंड ठोठावलाय.
सामना संपल्यानंतर दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात बोलण्यासाठी थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील मैदानावर आले. सामना संपल्यानंतर राजीव शुक्ला अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठीसोबत चर्चा केली.
दिग्वेश राठी यापूर्वीही आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत राहिला आहे. BCCI ने त्याच्यावर या सेलिब्रेशनसाठी आधी दोन वेळा दंडही ठोठावला होता. गेल्या वेळेस त्याने प्रियांश आर्यच्या विकेटनंतर अशाचप्रकारे सेलिब्रेट केले होते आणि ते त्याला महागात पडले. मात्र यावेळी अभिषेक शर्मा पुढे आला आणि दिग्वेशच्या सेलिब्रेशनवर जोरदार आक्षेप घेतला.
दिग्वेशने अभिषेककडे “बाहेर जा” असा इशारा करत सेलिब्रेट केलं, त्यानंतर अभिषेक परत वळला आणि दोघांमध्ये भर सामन्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची झाली. पंच आणि कर्णधार ऋषभ पंतने मध्ये येऊन वाद शांत केला.





