गंगापूर येथील श्रीकृष्णा गोशाळेच्या “10 मिनिटे गौसेवा” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोशाळेत गायींच्या सानिध्यात मिळते मानसिक समाधान

आशिष कोकरे (शहर प्रतिनिधी)

नाशिक : आधुनिक जीवनातील धावपळ, ताणतणाव आणि मानसिक दबाव यामुळे अनेक जण शांततेच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत गोशाळेतील शांत वातावरण आणि गायींचा सहवास अनेकांना मानसिक समाधान व सकारात्मक ऊर्जा देत असल्याचे अनुभवातून समोर येत आहे.

गंगापूर येथील श्रीकृष्णा गोशाळेत दररोज अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक चारा देण्याच्या निमित्ताने भेट देऊन काही वेळ गायींच्या सानिध्यात घालवतात. गोशाळेतील शांत वातावरण, हिरवागार परिसर आणि गौसेवेची संधी यामुळे मन प्रसन्न होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व असून गौसेवा ही श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. गोशाळेत गायींना चारा देणे, त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवणे तसेच काही वेळ ध्यान व प्रार्थना करणे यामुळे मानसिक समाधान मिळते, असे गौभक्तांचे मत आहे.

श्रीकृष्णा गोशाळा व जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब यांच्या वतीने “10 मिनिटे गौसेवा” हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी दररोज काही वेळ गोशाळेत येऊन गौसेवा करावी, तसेच गायींसाठी चारा घेऊन यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोशाळा परिसर हा निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी, आत्मचिंतनासाठी आणि सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
संपर्क
विजयकुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष
श्रीकृष्णा गोशाळा
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब
शिवसुमन आनंदाश्रम
मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, नाशिक – 422222
📞 8888947979 | 8888897857
📞 9637523284 | 7720030574



गोशाळेत गायींच्या सानिध्यात बसण्याचे फायदे 🐄✨
गौसेवा ही फक्त धर्म नाही, विज्ञान पण आहे. श्रीकृष्णा गोशाळेत 10 मिनिटे शांत बसलं की फरक जाणवतो.

- मानसिक शांती
गायीच्या जवळ बसल्यावर कॉर्टिसोल म्हणजे ‘टेन्शन हार्मोन’ कमी होतो
श्वासोच्छ्वास हळू होतो, मन शांत होते
डिप्रेशन, चिंतेवर नैसर्गिक उपाय – याला “Cow Therapy” म्हणतात
- आरोग्यासाठी
गोशाळेची हवा: गायी सोडतात तो ऑक्सिजन + गोमय-गोमूत्राचे बाष्प हवेत जंतुनाशक म्हणून काम करतं. श्वसनाचे विकार कमी होतात
गो-रज: पायाला लागणारी माती इम्युनिटी वाढवते
रक्तदाब, हृदयाचे ठोके नॉर्मल होतात
- आध्यात्मिक उर्जा
शास्त्र सांगतं – 33 कोटी देव गायीच्या अंगात वास करतात
कामधेनूच्या सानिध्यात बसल्याने मनातील नकारात्मकता निघते
ध्यान, जप, लेखन करण्यासाठी सर्वोत्तम जागा
- क्रिएटिव्हिटी वाढते
गायींचा घंटेचा आवाज, शेणाचा सुगंध, हिरवा चारा – हे सगळं मेंदूला ‘अल्फा वेव्ह’ मोडमध्ये नेतं. - रोगप्रतिकारक शक्ती
संशोधन सांगतं – गोशाळेत वेळ घालवणाऱ्या लोकांची इम्युनिटी 20% पर्यंत वाढते. गोमूत्राचे सूक्ष्म कण हवेत असतात जे अँटी-बॅक्टेरियल आहेत.
शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम:
“10 मिनिट गौसेवा” – रोज फक्त 10 मिनिटे गायीला चार द्या, अंगावरून हात फिरवा. बघा आयुष्य कसं बदलतं.





