नाशिकमध्ये महिलांसाठी सुरू झालाय नवा मंच… वर्षभर उपक्रमांचे आयोजन, सदस्य नोंदणीला सुरूवात
विकासाची वाट महिला मंच : राज्यस्तरीय महिलागौरव पुरस्काराने होणार महिलांचा गौरव


नाशिक (प्रतिनिधी) – महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, नाशिकमध्ये वेगवेगळ्या सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी विकासाची वाट महिला मंच सुुरू झाला आहे. विकासाची वाट महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. युगंधरा पाटील यांच्या संकल्पनेतून सुुरू करण्यात आलेल्या विकासाची वाट महिला मंचल्या निमित्ताने महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासोबतच महिला मंचची सदस्य नोंदणी केलेल्या सर्व महिलांचा राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. एका वर्षासाठी 399- रुपये नाममात्र शुल्क भरून महिलांना महिला मंचचे सदस्य होता येणार असल्याचे अध्यक्षा डॉ. युगंधरा पाटील यांनी सांगितले.
काय आहे विकासाची वाट महिला मंच? जाणून घेऊयात…
विकासाची वाट महिला मंचची नोंदणी केलेल्या सदस्यांना वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.…

सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनासोबतच विकासाची वाट महिला मंचला सदस्य नोंदणी केलेल्या महिलांना…
☘️ राज्यस्तरीय “महिलारत्न पुरस्कार” देऊन सन्मान.
☘️ दर महिन्याला 2 कार्यशाळा.
☘️ वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.
☘️ सर्व सदस्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन.
☘️ वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.
☘️ वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी.
☘️ हळदी कुंकू कार्यक्रमात मिळणार प्रत्येक सदस्याला मिळणार गिफ्ट.
☘️ सेलिब्रिटींशी गप्पा.
☘️ वेळोवेळी सदस्यांसाठी क्षेत्रीय अभ्यास सहलींचे आयोजन.
☘️ सदस्य महिलांच्या गुणवंत पाल्यांचा होणार शैक्षणिक वर्षात सन्मान.
☘️ आकर्षक ओळखपत्र…

📎
विकासाची वाट महिला मंच…
(सन्मान कर्तृत्वाचा…)
कार्यालय : राज्य कर्मचारी वसाहत, अशोकनगर रोड, सावरकरनगर, सातपूर, नाशिक.
संपर्क : सविता साळवे, मुुख्य समन्वयक, नाशिक. (संपर्क क्रमांक – 8830720932, 7720030574)
सदस्य होण्यासाठी:
नोंदणी शुल्क फक्त 399 रुपये.





